Home Breaking News Chandrapur city@ news • आमदारांच्या तत्परतेमुळे ‘त्या’ युवकावर वेळीच उपचार • दुचाकी...

Chandrapur city@ news • आमदारांच्या तत्परतेमुळे ‘त्या’ युवकावर वेळीच उपचार • दुचाकी अपघात: रुग्णवाहिका बोलावून पाठविले रुग्णालयात.

179

Chandrapur city@ news
• आमदारांच्या तत्परतेमुळे ‘त्या’ युवकावर वेळीच उपचार
• दुचाकी अपघात: रुग्णवाहिका बोलावून पाठविले रुग्णालयात

चंद्रपूर :- चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील शेणगाव फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालक रवींद्र महादेव मत्ते हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, याच रस्त्याने घुग्घुस येथील जनसंपर्क आटोपून आ. किशोर जोरगेवार हे चंद्रपूरकडे येत होते. त्यांना हा अपघात दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी युवकाला रुग्णालयात पाठविले. आ. जोरगेवार यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्या युवकाला तत्काळ उपचार मिळण्यास मदत झाली.
माणुसकी म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अनेकवेळा अपघात झाल्यानंतर जखमीला त्याच ठिकाणी सोडून अनेकजण पळून जातात. माणुसकी म्हणून प्रत्येकाने अशा अपघाताच्या वेळी संबंधित रुग्णाला मदत केली पाहिजे. आपण या रस्त्याने जात असताना अपघात झाल्याचे दिसले. त्यामुळे त्या रुग्णाला मदत म्हणून रुग्णवाहिका बोलावून दिली, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.