Home Breaking News Bhadravati taluka@ news • शिंदे साहेबांचे कार्य प्रेरणादायी:डॉ. विवेक शिंदे •...

Bhadravati taluka@ news • शिंदे साहेबांचे कार्य प्रेरणादायी:डॉ. विवेक शिंदे • नीळकंठराव शिंदे जयंती उत्सवानिमित्त गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्ती सत्कार. • वृक्षारोपण करून जयंती साजरी.

319

Bhadravati taluka@ news
• शिंदे साहेबांचे कार्य प्रेरणादायी:डॉ. विवेक शिंदे

• नीळकंठराव शिंदे जयंती उत्सवानिमित्त गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्ती सत्कार.

• वृक्षारोपण करून जयंती साजरी.

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती:भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव तथा माजी आमदार स्वर्गीय नीलकंठराव शिंदे यांच्या ८१ वा जयंती उत्सव यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाला. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना नीळकंठराव शिंदे साहेबांचे कार्य प्रेरणादायी आहेत, असे गौरवोद्गार डॉ. विवेक शिंदे यांनी काढले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव व माजी आमदार स्व. नीळकंठराव शिंदे यांच्या ८१ व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती हे होते, तर प्रमुख अतिथी डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, सत्कारमूर्ती प्राध्यापक धनराज अस्वले, एस. एस. आसुटकर , एम. जी. असुटकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
निळकंठराव शिंदे साहेबांच्या ८१ व्या जयंती उत्सवानिमित्त दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत समय रविकांत टोंगे याने ६२८ गुण प्राप्त करून व तेजस मालेकर याने ६१५ गुण प्राप्त करून भद्रावतीच्या इतिहासात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव गौरवान्वित केले.

यांचाही यावेळी पालकांसह सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत पियुष राजूरकर , गुंजन मुसावत, वैष्णवी केंद्रे, हिमांशी चतारे, मयुरी ठमके, साक्षी मत्ते, झोया सय्यद, प्रेरणा घाटे इत्यादी विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत साहेबा शेख, विभूती सेरेकर ,वेदांत उताणे, आशिष देऊरकर आदी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केल्याने त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक धनराज अस्वले यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली, त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेत प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले एम. जी. आसुटकर व एस. एस. आसुटकर यांचाही यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक धनराज अस्वले यांनी शिक्षणासाठी वयाची अट नाही, तर शिक्षण घेण्याची जिद्द मानवाच्या मनात असावी, असा मौलिक संदेश दिला. जगात पैसा महत्त्वाचा नसून विद्या महत्त्वाची आहे , असे त्यांनी सांगितले. एम. जी. आसुटकर यांनी सेवानिवृत्तीच्याप्रसंगी आपले अनुभव कथन केले.

स्व. नीळकंठराव शिंदे साहेबांच्या ८१ व्या जयंतीचे औचित्य साधून शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर मोते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाला गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.