Home Breaking News Chandrapur city@ news • प्रयत्नवादी बनून यशाचे शिखर गाठा:आ.किशोर जोरगेवार •...

Chandrapur city@ news • प्रयत्नवादी बनून यशाचे शिखर गाठा:आ.किशोर जोरगेवार • यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

542

Chandrapur city@ news
• प्रयत्नवादी बनून यशाचे शिखर गाठा:आ.किशोर जोरगेवार

• यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:प्रत्येक गुणवंत विद्यार्थी समाजाच्या कामात आला पाहिजे. त्याने स्व:ताचे आणि पर्यायाने जिल्ह्याचे नाव देशात लौकिक करावे. शिक्षणातून पिढीचे कल्याण होते. आजच युग स्पर्धेच असुन यात टिकुन रहायच असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा. नशिबाला किंवा परिस्थितीला दोष न देता प्रयत्नवादी बनुन यशाचे शिखर गाठा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. इंदिरा गांधी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे यंग चांदा ब्रिगेड शिक्षण आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विनय गौडा, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, प्रा. राजेश इंगोले, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय जस्वाल, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद काटकर,समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयेश चक्रवर्ती, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, शिक्षण क्षेत्रात मोठ काम करण्याचा संकल्प आपण केला आहे. विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करावे अशी अपेक्षा करत असतांना त्यांना योग्य सोयी सुविधाही उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे या दिशेने आम्ही प्रयत्न सुरु केले आहे. मतदार संघात ११ अभ्यासिका आपण तयार करत आहोत. यातील ८ अभ्यासिकांच्या कामाला सुरुवात झाली आहे. यात एक लाख पुस्तकांची क्षमता असणा-या पवित्र दिक्षाभुमी येथे तयार होत असलेल्या अभ्यासिकेचाही समावेश आहे. तर मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेत असलेल्या शिक्षण संस्थांनाही आपण बळकट करण्याचे काम करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्या गेला आहे. हा सत्कार आपल्या यशाची पावती आहे. हा आपल्या आयुष्याला दिशा देणारा हा प्रसंग आहे. आज पासुन आपल्या आयुष्याची नवी दिशा ठरणार आहे. त्यामुळे तज्ञाचे मार्गदर्शन घेत योग्य निर्णय आपण घ्यावा, ज्यात आवड आहे. ते क्षेत्र काळजीपूर्वक निवडावे, असे आवाहण यावेळी बोलताना आ. जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिक्षणासाठी आमच्याकडे मदत मागायला येणा-यांची संख्या कमी असते अशी खंत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलुन दाखविली. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात कोणतीही अडचण आल्यास त्यांनी ती कळवावी असे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी येथून विद्यार्थ्यांना पूढचा महत्वाचा प्रवास सुरु झाला आहे. यात योग्य निर्णय घ्यावा असे सांगत मौलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात पूष्पा पोडे, डॉ. राजेश इंगोले, राजेश नायडू, हर्षल नेवलकर, दिनेश मोदी, स्मित अलुरवार यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बदल विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी १० वी आणि १२ वी च्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निट परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरोज चांदेकर यांनी, प्रास्ताविक पंकज गुप्ता तर प्रतिक शिवणकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शिक्षण विभाग प्रमुख प्रतीक शिवनकर, अल्पसंख्यांक आघाडी शहर अध्यक्ष राशेद हुसैन, चंद्रपूर मतदार संघ संघटिका सविता दंडारे, वीज कामगार संघटना संपर्क प्रमुख विश्वजीत शहा, ग्रामीण संघटक मुन्ना जोगी, सलीम शेख, करण सिंह बैस, नकुल वासमवार, अँड. परमाहंस यादव, अँड. राम मेंढे, चंद्रशेखर देशमुख, हेरमन जोसेफ, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, वैशाली मेश्राम, विमल काटकर, आशा देशमुख, अस्मिता दोनाडकर, वैशाली मद्दीवार, दिनेश इंगळे, आशु फुलझले, बबलू मेश्राम, किशोर बोलमवार, माधुरी निवलकर, माधुरी वनकर, कविता निखारे, ताहीर हुसेन, रुपा परसराम, आनंद रणशूर, तापुश डे, किशोर बोल्लमवार, प्रशांत रोहनकर, सतनाम मिर्धा, चंदा इटनकर, कल्पना शिंदे, शांता धांडे, नंदा पंधरे, अनिता झाडे, प्रेमिला बावणे, अलका मेश्राम, कविता निखारे, आदींनी परिश्रम घेतले.