Home Breaking News Chandpur city@ news • प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले पर्यावरण स्नेही बांबू बांधकामाचे धडे ...

Chandpur city@ news • प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले पर्यावरण स्नेही बांबू बांधकामाचे धडे • वेकोली आणि बांसचा उपक्रम !

113

Chandpur city@ news
• प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले पर्यावरण स्नेही बांबू बांधकामाचे धडे

• वेकोली आणि बांसचा उपक्रम !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:पर्यावरण स्नेही बांबू बांधकाम क्षेत्र हे पर्यावरण संरक्षणासोबतच बांबू कारागीरांसाठी शाश्वत रोजगार निर्मितीचे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. तसेच झपाट्याने विस्तारणाऱ्या बांबू बांधकाम क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्यामुळे वेकोली चंद्रपूर क्षेत्राच्या निगमित सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत यशोदीप संस्था आणि बांबू आर्ट अँड नेचर सोसायटी (बांस) च्या वतीने स्थानिक नीम वाटिका, रयतवारी कॉलरी येथे आठ दिवसीय बांबू बांधकाम कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन युवक युवतींसाठी करण्यात आले होते.

वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक संजय वैरागडे यांच्या पुढाकाराने तसेच प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या सदरहु प्रशिक्षण कार्यशाळेत बांबू बांधकामाशी संबंधित विविध तंत्रे आणि पद्धतींचा उपयोग करून बांबू बांधकाम तज्ञ व मुख्य प्रशिक्षक,बांबू आर्ट अँड नेचर सोसायटीच्या सचिव अन्नपूर्णा धुर्वे-बावनकर यांच्या मार्गदर्शनात आकर्षक अशी बांबूची वास्तू प्रशिक्षणार्थींनी निर्माण केली. या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप नुकताच महाव्यवस्थापक (कार्ययोजना) सईद नाझीमुद्दीन यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. याप्रसंगी क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक आर. के. सिंग, नोडल अधिकारी (पर्यावरण) प्रशांत ठाकेर, स्टाफ अधिकारी (स्थापत्य) नितीन नाईक, कल्याण समिती सदस्य सैजूद्दीन शेख, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार, सहाय्यक पर्यवेक्षक किशोर गायकवाड, प्रबंधन प्रशिक्षणार्थी अमल कृष्णन, उप अभियंता सिमय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढील भविष्य व कार्यासाठी शुभेच्छा देवून काळाची गरज असलेल्या पर्यावरण स्नेही बांबू बांधकाम प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. प्रशिक्षणार्थींना या वेळी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

प्रशिक्षणार्थींना बांबूटेक ग्रीन सर्विसेस या बांबू बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेद्वारा नियुक्तीपत्र देण्यात आले असून लवकरच संस्थेच्या विविध बांबू बांधकाम प्रकल्पात त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत ठाकेर यांनी केले. तर संचालन अनिल दहागावकर यांनी केले . उपस्थितीतांचे आभार आशिष गोलदार यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अभय रॉय, संध्या तोगर, ध्रुवदास मंडरे, मधुकर मून, प्रवीण कावेरी, नीलेश पाझारे, सुरज सोनारकर, राहुल स्वामी, रितेश बडवाईक, गौरव तोगर, अभिनय जोंधळे, भूषण नंदनवार, जयंती गावरे, प्रतीक्षा कांबळे, मयंक मून, अक्षद कारूष, श्रेयश धोटे, कनिंकनाथ भडके, मंगला यादव, पराग यांनी अथक परिश्रम घेतले.