Home Breaking News Ballarpur city@ news • कार्यालयीन व शाळेच्या वेळेत बल्लारपूर शहरातून जड वाहतूक...

Ballarpur city@ news • कार्यालयीन व शाळेच्या वेळेत बल्लारपूर शहरातून जड वाहतूक बंद करा- राजु झोडेंची मागणी • बल्लारपूर पोलिस स्टेशनला दिले निवेदन

54

Ballarpur city@ news
• कार्यालयीन व शाळेच्या वेळेत बल्लारपूर शहरातून जड वाहतूक बंद करा- राजु झोडेंची मागणी

• बल्लारपूर पोलिस स्टेशनला दिले निवेदन

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर: बल्लारपूर हे शहर औद्योगिक शहर म्हणून अख्ख्या विदर्भात ओळखल्या जाते. शहराच्या मधातूनच मुख्य महामार्ग गेल्यामुळे शहरात नेहमी वाहकतुकीची वर्दळ असते. दररोज हजारों ट्रक व अन्य वाहने या महामार्गालगत जात असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नुकताच आज सकाळी विद्यार्थ्यांच्या ॶॅटोला एका ट्रकने धडक दिल्यामुळे काही विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. शहरातील मुख्य मार्गावर सकाळी व सायंकाळच्या वेळेस कार्यालयीन कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने ये जा करतात. यामुळेच सदरहु वेळेत प्रचंड गर्दी असते तदवतचं वाढत्या जड वाहतूक वाहनांमुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते.
बल्लारपूर हे शहर मोठे असल्याने या शहराला बायपास रोड देण्यात यावा व कार्यालयीन व शाळेच्या वेळेत शहरातील जड वाहतूक बंद करावी अशी प्रमुख मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बल्लारपूरच्या पोलिस ठाणेदारांना एका लेखी निवेदनातून आज केली आहे. तात्काळ या शहराला बायपास रोड देऊन सदरहु कार्यालयीन व शाळेच्या वेळेत जड वाहतूक बंद करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा राजु झोडे यांनी प्रशासनाला व पोलिस विभागाला निवेदनातून दिला आहे
निवेदन देताना राजू झोडे,संपत कोरडे,श्याम झिलपे, नंदलाल वर्मा, नवीन डेविड, नितिन सोयाम, संजय जिलेवार, जाकिर खान तथा उलगुलान संघटनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाची एक प्रत बल्हारपूरच्या तहसिलदारांना देखिल सादर करण्यात आली असल्याचे राजू झोडे यांनी या प्रतिनिधीस आज सांगितले.