Home Breaking News Chandrapur city@ news • विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचा-यांची येत्या ९ऑगस्टला चंद्रपूरात भव्य...

Chandrapur city@ news • विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचा-यांची येत्या ९ऑगस्टला चंद्रपूरात भव्य बाईक रॅली !

114

Chandrapur city@ news
• विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचा-यांची येत्या ९ऑगस्टला चंद्रपूरात भव्य बाईक रॅली !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: अंशदायी पेन्शन योजना NPS रद्द करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणींसह इतरही प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शासनाचे मागणी संदर्भात लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी यांचे वतीने बुधवार दि.९ऑगस्टला भव्य राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे एक जेष्ठ पदाधिकारी दिपक जेऊरकर यांनी आज या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी एका भेटी दरम्यान दिली.
पी. एफ. आर. डी.ए. कायदा रद्द करा, जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा, आठवी वेतन समिती जाहीर करा, कंत्राटी पध्दत बंद करा व सर्व रिक्त पदे भरा, किमान वेतन रु.28000/- करा, भारतीय दंड संहिता 253 ही कलम रद्द करु नये, कामगार विरोधी कायदे रद्द करा आदी मागण्यांसंदर्भात राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरहु बाईक रॅली दुपारी 1.30 वाजता सुरु होईल ती रैली न्यु इंग्लिश हायस्कुल ते गांधी चौक-जुटपुरा गेट-जनता कॉलेज-बंगाली कॅम्प या मुख्य मुख्य मार्गाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचेल.
आयोजित या बाईक रॅलीत जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परीषद कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, बँक, विमा, केंद्रीय कर्मचारी, सर्व क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तंपणे सहभागी व्हावे असे आवाहन राज्य यांना सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजु धांडे, कोषाध्यक्ष संतोष अतकारे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिंगलदीप कुमरे, कोषाध्यक्ष नंदकिशोर गोल्हर व शिक्षक संघटनेचे जिल्हा निमंत्रक विजय भोगेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.