Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस शहरात इलेक्ट्रिक केबल भूमिगत करणे व ए.बी....

Ghugus city @news • घुग्घुस शहरात इलेक्ट्रिक केबल भूमिगत करणे व ए.बी. केबल टाकने सुरु. • देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश.

357

Ghugus city @news
• घुग्घुस शहरात इलेक्ट्रिक केबल भूमिगत करणे व ए.बी. केबल टाकने सुरु.
• देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश.

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:घुग्घुस शहरातील मुख्य मार्गावरील इलेक्ट्रिक लाईन भूमिगत करण्याचे काम शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी तिलक नगर येथून सुरु करण्यात आले आहे.

त्यामुळे घुग्घुस शहर इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून मुक्त होणार आहे. यासंदर्भात माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

घुग्घुस शहर हे औद्योगिक शहर असुन, येथे मोठ्या प्रमाणात सर्वधर्माचे सण साजरे केल्या जातात. मोठ मोठया मिरवणुका निघतात. शहरातील मुख्य मार्गावर पथदिवे व थ्री फेस लाईनच्या केबलचे जुने जाळे आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात जोरदार वादळ वाऱ्यामुळे केबल एकमेकांना लागून वीजपुरवठा खंडित होतो.

ही समस्या लक्षात घेऊन माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शहरातील मुख्य मार्गावरील इलेक्ट्रिक लाईन भूमिगत करणे व शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील लाईनचे केबल ए.बी. केबल मध्ये (सिंगल वायर) मध्ये परावर्तित करण्यासाठी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरवठा केला.

सततच्या पाठपुरव्याला यश येऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार शहरातील मुख्य मार्गावरील इलेक्ट्रिक लाईन भूमिगत करण्यात येत असून शहारातील १८ किलोमिटर इलेक्ट्रिक लाईनचे रूपांतर इतर सिंगल केबलमध्ये होणार आहे. यात नकोडा गावासोबत इतर २८ गावांचा समावेश आहे.
या गावात २५ किलोमीटर केबल टाकण्यात येणार आहे.

या कामाचे टेंडर झाले असून ठेकेदाराने सर्वे पूर्ण केला होता व केबल मार्किंग सुद्धा झाले होते.

त्याअनुषंगाने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, गणेश कुटेमाटे, श्रीकांत बहादूर, असगर खान व वार्डवासियांनी कामाची पाहणी केली.

या कार्याबद्दल घुग्घुसवासियांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले असून माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे अभिनंदन केले आहे.