Home Breaking News Ballarpur city @news • हजरत बाबा जलाल दरबार यांचा मूलनिवासी दिनी निघालेल्या...

Ballarpur city @news • हजरत बाबा जलाल दरबार यांचा मूलनिवासी दिनी निघालेल्या रॅली चे भव्य स्वागत

429

Ballarpur city @news
• हजरत बाबा जलाल दरबार यांचा मूलनिवासी दिनी निघालेल्या रॅली चे भव्य स्वागत

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- जागतिक मूलनिवासी दिवस निमित्त आदिवासी समाज द्वारे बल्लाळशाह जि. चांदागड च्या वतीने गोंड राजे बल्लाळशाह समाधी ते चंद्रपूर मार्गे गोंड राजे बल्लाळशाह सांस्कृतिक नाट्यगृहापर्यंत निघालेल्या आदिवासी बांधवांच्या भव्य रॅलीचे स्वागत भाजपा अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने नगर परिषद चौक येथे स्वागत करण्यात आले.
यावेळी हजरत बाबा जलाल दरबार चे प्रमुख अब्दुल रहमान औरासे, नुरीताज फाउंडेशन चे संस्थापक तथा भाजपा जिल्हा अल्पसंख्यक मोर्चा चे अध्यक्ष जुम्मन रिजवी, डॉ. मासटवार, सुनिल औरासे, गिरिधर औरासे, सुधाकर मेटे, शेख हुसैन, सय्यद हमजा, शेख युसूफ, शेख अजहर, प्रशांत सातपुते, मनिश देवईकर, गणेश मोहुर्ले, प्रकाश लोखंडे, भिकु दाऊद, दादोजी क्रिष्णा भाऊ, शालिक मेढे, गुणवंत सिडाम, कोमल खांडवा, प्रतिक मोहुर्ले, गणेश मेढे यांनी सर्व धर्म समभाव राखत रॅलीतील सर्व बांधवांचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. किसनराव कोटनाके, विजय कुंभरे, डॉ. प्रकाश वट्टी, गिरीधर औरासे, भास्कर पेंदोर, कविता मडावी, सुधाकर कन्नाके, गुणकार जुमनाके, अल्काताई गेडाम, सुधाकर कुळसंगे, नंदु भोयर सह अन्य मान्यवर समाज बांधवांचे स्वागत करुन त्यांना मुलनिवासी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.