Chandrapur dist@ news
• मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय औरोबिंडो रिॲल्टी ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बांधकामास व उत्खनन करण्यास परवानगी देण्यात येवू नये -एका शिष्टमंडळाने दिले चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:औरोबिंडो रिॲल्टी ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर या प्रायव्हेट कंपनीला टाकळी,जेना ,कान्सा पानवडाळा डोंगरगांव या भागातील शेतकऱ्यांच्या व सदरहू ग्राम पंचायतीच्या मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित खान परिसरात बांधकाम व किंवा उत्खनन करण्यास परवानगी देण्यात येवू नये अश्या मागणीचे एक लेखी निवेदन आज सोमवार दि.२१ऑगस्टला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व वरोराचे तहसिलदार यांना सादर केले.
कंपनी प्रशासन जो पर्यंत जमीनीचा भाव ,नोकरी किंवा नोकरी ऐवजी आर्थिक मोबदला देत नाही तसेच पुनर्वसन बाबत सकारात्मक निर्णय घेत नाही तो पर्यंत त्यांना उपरोक्त परवानगी देण्यात येवू नये असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आज निवेदन देताना जेनाच्या सरपंच प्रभा बोलाढे, उपसरपंच हरिचंद्र आसुटकर,ग्राम पंचायत सदस्य राहूल सोनेकर,राजू ठाकरे,आतिश पिंपळशेंडे,हेमंत धानोरकर,इश्वर खामनकर, सुरेश कांबळे,निकेश ताजणे, विनोद ताजणे,वाचेपत्ती खामनकर आदिं उपस्थित होते.