Home Breaking News Chandrapur city@ news • सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी होणार चौकशी!

Chandrapur city@ news • सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी होणार चौकशी!

350

Chandrapur city@ news
• सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी होणार चौकशी!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्थानिक शासकीय रुग्णालयात निष्ठेने व प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिका सीमा मेश्राम यांना वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती.

या संदर्भात या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व उलगुलान संघटनेचे नेते राजू झोडे यांनी केली होती.

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी या बाबतीत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. तद्वतच उपरोक्त संदर्भात येत्या मंगळवारी एका बैठकीचे आयोजन केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकारी व डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी आता जनतेतून होवू लागली आहे.