Ballarpur city२ news
•बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने गरजू लोकांना अन्नधान्य किट व अन्य साहित्यांचे वाटप !
•विद्यार्थ्यांनाही वाटप केली शालेय सामुग्री
सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)
बल्हारपूर : बल्लारपूर तालुका फोटोग्राॅफर असोसिएशन गत ३ वर्षांपासून सामाजिक दायित्व व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान शिबिर, आर्थिक दुर्बळ व्यक्तीस आरोग्यासाठी आर्थिक सहाय्य, अन्नदान आदिं समाज कार्य करीत आहे
शनिवार दि.१९ ऑगस्ट २०२३ ला जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन बल्लारपूरच्या वतीने बल्लारपूर शहरासह बामणी येथे प्रत्यक्ष गरीब गरजू लोकांच्या घरी जाऊन अन्नधान्य किटचे वितरण, ताडपत्री वितरण, कंबड वितरण, शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण व स्कूल बॅग वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चंदनसिंह चंदेल (माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) घनशयाम मुलचंदानी (माजी नगराध्यक्ष, बल्लारपुर) सिक्की यादव (नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर) राजू झोडे (सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर) प्राची राजुरकर (API पोलीस ठाणे बल्लारपूर)काशिनाथ सिंह (सामाजिक राजकीय कार्यकर्ता बल्लारपूर) अरुणभाऊ वाघमारे (नगरसेवक बल्लारपूर) व सुभाष ताजणे (उपसरपंच बामणी) आदिं उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बल्लारपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य संजय वानखेडे ( अध्यक्ष), निलेश घुमे (उपाध्यक्ष), राहुल कडूकर (सहसचिव),प्रेमचंद चौधरी (कोषाध्यक्ष),श्रीकांत येनुरकर, दिनेश लिचोडे, दिलीप नाईक, स्नेहदिप सोगे, राजू सिंग, प्रवीण साठे,रुपेश सिंग, संजय अहिरवार , विजय ढोके, नागराज गद्देवार,मिलिंद दारुंडे, अश्विन रामटेके, अशोक नाईक यांनी अथक परिश्रम घेतले.