Home Breaking News Ballarpur city@ news •जवेरी महाविद्यालयात मतदान जनजागृति कार्यक्रम संपन्न

Ballarpur city@ news •जवेरी महाविद्यालयात मतदान जनजागृति कार्यक्रम संपन्न

41

Ballarpur city@ news
•जवेरी महाविद्यालयात मतदान जनजागृति कार्यक्रम संपन्न

बल्लारपुर:मोहसिन भाई जवेरी कन्या महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक दिनांक 23 अगस्त रोजी मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. बल्लारपूरचे नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित होते, त्यांनी अठरा वर्षावरील विद्यार्थिनींना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असल्यामुळे, आपले मतदान बहुमूल्य असल्यामुळे मतदार नोंदणी करून आपले मतदान कार्ड कसे बनवायचे व मतदानाचा अधिकार प्राप्त करून देशाचे उज्वल भविष्य बनविण्यासाठी आपण आपले कर्तव्य पार कसे पाडायचे याची सविस्तर, माहिती त्यांनी दिली, त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना डोमेशियल , कास्ट सर्टिफिकेट, स्कॉलरशिप बाबींच्या सवलती इत्यादींची माहिती दिली, या कार्यक्रमात रसेयो अधिकारी प्राध्यापिका विना झाडे, प्रा. उमा शेख, प्रा. संगीता मॅडम, प्रा. दीपिका उंबरे ,प्रा. शशी सिंग, प्रा. दिव्या, प्रा.सपना माझी त्याचप्रमाणे नीरज बहिरे सर, आर. के आकुजवार ( तलाठी) बल्लारपूर इत्यादींची उपस्थिती होती.