◽🔸श्रावण मास🔸◽
केशरी सडा कोण शिंपडे
वर कोवळे सोनेरी छडे
निसर्ग चक्र ऋतूंचें चार
ग्रीष्मात फुले बहावा फार
फुलाफुलांचे, रूप वेगळे
औषधियुक्त ढंग आगळे
झाडीतून हळू माडांच्या आड
डोकावतात किरणे द्वाड
प्रभात काळी श्रावणमासी
फुलांस गंध दरवळशी
क्षितिजावर रंग उधळे
इंद्रधनुची कमान खेळे
सरी गोजिऱ्या, उन्हात साजिऱ्या
कशा चमकल्या सखी लाजऱ्या
रंग बेरंगी फुलपाखरू
भिरभिरता हातात धरु
नागपंचमीचा झुले हिंदोळा
पंचपक्वान्न चाले सोहळा
माहेर ओढ अश्रूंची जोड
श्रावणधारा नाहीच तोड
सुवर्णमयी आहे सासर
हळवे पुष्प माझे माहेर
◻️♦️सौ रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर