Chandrapur city news
• चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेबाबत श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूरच्या इलेक्ट्रॉनिक ॲंड टेलिकम्युनिकेशन विभागाने केला आनंदोत्सव साजरा
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
चंद्रपूर – भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे. या यशस्वी मोहिमेबाबत श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता व तो खरा करुन देखील दाखवला . इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर दि. २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल.
इस्त्रोच्या या अभुतपूर्व यशाबद्दल श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूरच्या इलेक्ट्रॉनिक अॅंड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आनंद साजरा करतात आला यावेळी चंद्रयान ३ चे प्रात्याक्षिक तयार करून सर्व वैधानिक यांचे अभिनंदन करून भारत माता कि जय, जय विज्ञान आश्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक येरगूडे यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिकांनी केलेल्या मेहनती, परिश्रमाकडून बोध घेऊन येणा-या पिढीने सुद्धा यात सहभागी होऊन नवनविन वैज्ञानिक अविष्कार घडवून आणले पाहिजे असे आवाहन या वेळी बोलताना केले .तसेच टेक्निकल अभ्यासक्रमात संस्थेतील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी सहकार्य करण्यासाठी संस्था सदैव उभी राहील असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी प्राचार्य पिल्लारे व पाकमोडे यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक येरगूडे, प्राचार्य पिल्लारे ग्रंथपाल प्रा बोबडे ,इलेक्ट्रॉनिक अॅड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. पाकमोडे प्रा. निलेश बेलखेडे प्रा धोटे , प्रा.पाटील प्रा.पाठक प्रा.बोबडे , प्रा भालोटिया ,सचिन ढेंगळे तसेच इलेक्ट्रॉनिक विभागातील सर्व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.