♦️मनभावन श्रावण आला♦️
◽♦️◽वैशाली राऊत सहज सुचलं गृप नागपूर ◻️◻️
◻️🔸मनभावन श्रावण आला
पाना फुलांनी निसर्ग सजला
इंद्रधनू गगनी येता
पक्षांचा थवा नभी रंगला.(१)
◻️🔸घन निळा बरसत आला
हर्ष मना मंदी दाटला
उन्हं पावसाच्या खेळामध्ये
मयुराने पिसारा थाटला.(२)
◻️🔸हिरव शिवार पाहता
उत्साहाने भरे मन
भरभर वाढता पिक
होई आनंदाची उधळण.(३)
◻️🔸सणावारांची श्रावणात गर्दी
भजना पूजनाची लागतेया धुंदी
साज फळा फुलांचा पाहून
क्षणात पळे मन बेधुंदी.(४)
◻️🔸कोवळे तुषार किरण
त्यात अवखळ सरींची लहर
रानीवनी पाचुंचे रूप
भासे अनोखा मोहक बहर.(५)
◻️🔸बहर फुलांचा पाहता
मन श्रावणात दरवळे
स्पर्श सुखाची चाहूल
तनामनात सळसळे.(६)
◻️🔸हासरा लाजरा नाचरा
मनभावन श्रावण आला
प्रितीत रात्रीला खुलवत
सुगंधी श्वासात रंगला.(७)