Home Breaking News Chandrapur dist@ news • सीटीपीएसमधील कंत्राटी कामगार ‘ पीएफ’ पासून वंचित ...

Chandrapur dist@ news • सीटीपीएसमधील कंत्राटी कामगार ‘ पीएफ’ पासून वंचित • वेतन ही दोन दोन महिने उशिराने देत असल्याचा आरोप : साखळी आंदोलनाचा राजू झोडे यांचा इशारा

86

Chandrapur dist@ news
• सीटीपीएसमधील कंत्राटी कामगार ‘ पीएफ’ पासून वंचित

• वेतन ही दोन दोन महिने उशिराने देत असल्याचा आरोप : साखळी आंदोलनाचा राजू झोडे यांचा इशारा

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : येथील चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन येथे शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध कंपन्यांतर्गत काम करीत आहे. मात्र, विविध कंपन्यांकडून कामगारांचे शोषण केले जात आहे. नियमित वेतन न देणे, पीएफ न भरणे असे प्रकार कंत्राटदारांकडून सुरू असून, येथील नागपूरच्या कुणाल कंपनीने कामगारांचा मागील काही वर्षांपासून पीएफच भरला नाही असा आरोप उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे आणि कामगारांनी सोमवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

कामगारांकडून नियमित वेळेपेक्षा अधिक काम करवून घेतले जाते. दोन दोन महिने वेतन दिले जात नाही, ओव्हरटाईम दिला जात नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला. नियमित वेतन आणि पीएफ भरण्यासंदर्भात कंपनीकडे उलगुलान संघटनेने पत्रव्यवहार केला आहे. परंतु, या पत्राची दखलही संघटनेने घेतली नाही. विशेष म्हणजे सीटीपीएसमधील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा सगळा प्रकार सुरू असल्याचा आरोप राजू झोडे यांनी केला आहे. अधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत असतानाही कंपनीवर कारवाई केली जात नाही, उलट पाठराखण केली जात असल्याचा अरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान कामगारांचा थकीत पीएफ त्वरित भरण्यात यावा, वेतन नियमित देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी साखळी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेला राजू झोडे यांच्यासह रवी पवार, भीमराव सौंदरमल, गुरू भगत, कुणाल चौधरी, सुमित भिमटे, मंगेश बदखल, अक्षय राऊत, अमर गोलटकर उपस्थित होते.