Home Breaking News Varora taluka@ news • जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी राख्या बनवत...

Varora taluka@ news • जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी राख्या बनवत मुख्यमंत्र्यांना पाठविल्या ,जुनी पेन्शन योजनेसाठी भावनिक साद •महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना वरोरा चा उपक्रम

104

Varora taluka@ news
• जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी राख्या बनवत मुख्यमंत्र्यांना पाठविल्या ,जुनी पेन्शन योजनेसाठी भावनिक साद
•महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना वरोरा चा उपक्रम

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

वरोरा: दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना तालुका शाखा वरोरा च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या OPS राखी(जुनी पेंशन योजना) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला..त्यासाठी पंचायत समिती सभागृह वरोरा येथे तालुका संघटनेच्या महिला प्रतिनिधी एकत्रित आल्या व त्यांनी OPS राख्यांची निर्मिती केली .या राख्यांवर जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी यासाठी ” एकच मिशन जुने पेन्शन “असे नमूद केले आहे. महिला शिक्षकांनी तयार केलेल्या सर्व राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या. राखीसोबत जुनी पेन्शन लागू करावी यासाठी एक भावनिक साद घालणारे पत्र देखील प्रत्येक महिला भगिनींनी मुख्यमंत्री महोदयांना पाठविले.ज्या भगिनी या उपक्रमात सहभागी होऊ शकल्या नाही त्या सर्वांनी आपापल्या परीने राखी तयार करून मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आवाहन जुनी पेंशन संघटना वरोरा तर्फे आवाहन केले आहे.यावेळी प्रियंका तितरे, प्रतिभा वाकडे, अर्चना घुटके, निरांजली कुंभारे, वनिता धुडसे, स्वाती खराबे, श्वेता लांडे, दिप्ती चौखे, सुचीता कुळे, पूजा कुंटेवार, स्नेहल खिरटकर, सपना बोम्मावर, मनीषा नन्नावरे, जया पुनवटकर, माया ढेंगळे , आशा गोवारदिपे, अर्चना पिंपळशेंडे, वनकर मॅडम व नंदा चौधरी या पेंशन फायटर उपस्थित होत्या.