Home Breaking News Bramhpuri taluka@ news • ब्रम्हपुरी तालुक्यातील कृषी केंद्रात युरीया खताची किमतीत होणारी...

Bramhpuri taluka@ news • ब्रम्हपुरी तालुक्यातील कृषी केंद्रात युरीया खताची किमतीत होणारी शेतकऱ्यांची लुट थांबवा

105

Bramhpuri taluka@ news
• ब्रम्हपुरी तालुक्यातील कृषी केंद्रात युरीया खताची किमतीत होणारी शेतकऱ्यांची लुट थांबवा

✍️रवि चामलवार
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी: तालुक्यातील कृषी केंद्रात मध्ये शासनाने ठरवु दिलेल्या किमती पेक्षा अधिक किंमतीने युरीया खताचा काळाबाजार सुरू असल्याचे वास्तव ब्रम्हपुरी तालुक्यात दिसून येत आहे. शेतकऱ्यांला युरीया खत घेण्यासाठी दुसऱ्या खत घेण्यासाठी कृषी केंद्र चालकांकडून दबाव टाकला जातो आहे. जर शेतकऱ्यांनी जर दुसरा खत घेतला नाही तर त्याला युरीया खत दिला जात नाही.

शेतकरी आपली गरज व हतबल होऊन अधिक चे पैसे देऊन युरीया खत घेत आहेत. शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांकडून मानसिक त्रास व लुट केली जात आहे. युरीया खताची किमत शासनाने २६६ रुपये ठरवुन दीली असता कृषी केंद्र चालकांकडून तब्बल ३००ते ३५० रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात आहेत. पण पावती २६६ दिली जात आहे.

यांचा विरोध शेतकऱ्यांनी केला तर शेतकऱ्यांला युरीया खत दीले जात नाही. व उद्धट वागणूक दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास व आर्थिक लुट केली जात आहे. काही कृषी केंद्र चालकांकडून बिना पावती खताची विक्री केली जात आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील खताचा काळाबाजार त्वरित थांबविण्यात यावे. आणि कृषी केंद्र चालकांनी खताचा साठा फलक लावण्यात यावे. व काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावे अशा मागणी चे तक्रार निवेदन कृषी तालुका अधिकारी घुले मॅडम यांना देण्यात आले.

यावेळी प्रा. प्रशांत डांगे, चक्रेश कंरबे, सुरज शेन्डे, अमर गाडगे पत्रकार, विनोद दोनाडकर पत्रकार, निखिल डांगे पत्रकार अमोल माकोडे, नोगेश कंरबे, केशव रामटेके, चरणदास मेश्राम, हरीचंद्र सहारे आदी शेतकरी उपस्थित होते.