Home Breaking News Bhadravti taluka@ news •तब्बल ३१ वर्षांनंतर- भद्रावतीकरांनी अनुभवला ऐतिहासीक दहीहंडीचा उत्सव! •...

Bhadravti taluka@ news •तब्बल ३१ वर्षांनंतर- भद्रावतीकरांनी अनुभवला ऐतिहासीक दहीहंडीचा उत्सव! • हजारोंची उपस्थितीत पार पडला कार्यक्रम • मुकेश जिवतोडे यांच्या कडून होते दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन

114

Bhadravti taluka@ news
•तब्बल ३१ वर्षांनंतर- भद्रावतीकरांनी अनुभवला ऐतिहासीक दहीहंडीचा उत्सव!
• हजारोंची उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
• मुकेश जिवतोडे यांच्या कडून होते दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती (चंद्रपूर) :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी गोकुळाष्टमीचे औचित्य साधत ३१ वर्षानंतर शहरात प्रथमच भद्रावती क्रीडा संकुलात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.यात महिलांनी यंदा प्रथमच आपला सहभाग घेत दहीहंडी फोडून इतिहास रचला.दरम्यान या कार्यक्रमाला शहर वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा दहीहंडी उत्सव अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण होता. पुरुष गटासाठी ३३ फूट दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रोख ५१ हजार रुपयें तर २६ फूट दहीहंडी होणाऱ्या पथकाला रोख ३३ हजार रुपयांचे पारितोषिक होते. जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी या वर्षी महिला दहीहंडीचे आयोजन केले होते. विशेषता यात महिला पथकांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस ठेवलेले होते. सोबतच छोट्या बालक- बालिका, युवक- युवती व ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी श्रीकृष्ण माॅ राधा व माता यशोदा वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला परिक्षक म्हणून लोकमत सखी मंचच्या पदाधिका-यांनी विशेष सहकार्य केले. सदरहु स्पर्धेत भद्रावतीलच नव्हे तर वरोरा, चंद्रपूर येथील स्पर्धकांनी उत्स्फूर्तंपणे आपला सहभाग नोंदविला होता.

सोशल मीडियावर सक्रिय राहणांऱ्या युवक युवतींसाठी दहीहंडी उत्सवाचे उत्कृष्ट रिल्स तयार करण्यासाठी आकर्षक पारितोषिके ठेवली होती.या शिवाय या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाईव्ह ऑर्केस्ट्रा व लावणी नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते .दहीहंडी उत्सवाची सुरुवात विशेष आकर्षण असलेल्या महिलांच्या पथकांतर्फे करण्यात आली.

प्रथमच महिला दहीहंडी फोडण्याचा मान भद्रावतीच्या हिरकणी महिला मंडळ व मनिकादेवी महिला मंडळ(पोलीस पथक) यांना मिळाला. पुरुष गटासाठी ठेवलेली 33 फूट दहीहंडी कोणत्याही पथकाला फोडता आली नाही. परंतु जय महाकाली क्रीडा मंडळ चंद्रपूरच्या पथकाने 26 फूट उंच असलेली दहीहंडी फोडली तेव्हा टाळ्यांचा एकच गजर झाला. दहीहंडी उत्सवाला हजारों भद्रावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी भद्रावती वासियांचे आभार मानले. आगामी काळात भद्रावतीकरांसाठी असेच नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, माजी नगरसेवक दिनेश यादव , नागेंद्र ऊर्फ बंडु चटपल्लीवार, महेश जिवतोडे, किर्ती पांडे, सुनीता खंडाळकर, जयश्री कामडी, वर्षा पढाल, मनिषा ढोमने, वंदना ऊईके, कल्पना गट्टुवार, स्वप्निल ऊपरे, जितेंद्र गुलानी, सरफराज खान पठाण, सुनील रामटेके, अरविंद खोबरे, दत्तु बोरसरे,अभिजीत शिंदे,अरुण खोबरे,प्रकाश भंडारवार, सुनील देठे,संदिप मुडे,अमित निब्रड, सुधाकर मिलमिले, दिनेश यादव, माजी नगरसेविका सुषमा भोयर, वरोरा शहर प्रमुख संदिप मेश्राम, संयोजक अतुल नांदे, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, वरोरा तालुका प्रमुख विपीन काकडे, कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगने, शिवदुत बालाजी रूयारकर, शिवदुत मनिष ठक यांनी अथक परिश्रम घेतले .