Home Breaking News आयुष्यावर बोलू काही…! ♦️◽ सौ. ऋचा हनुमंत महाबळ सिंधुदुर्ग

आयुष्यावर बोलू काही…! ♦️◽ सौ. ऋचा हनुमंत महाबळ सिंधुदुर्ग

218

आयुष्यावर बोलू काही…!
♦️◽ सौ. ऋचा हनुमंत महाबळ सिंधुदुर्ग

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◻️◼️जरा चुकीचे! जरा बरोबर
जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो! आयुष्यावर बोलू काही ………..

हे सुंदर गीत संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील, संगीतबद्ध केले संदीप खरे यांनी आयुष्यावर बोलू काही या अल्बम मधील जीवनाचे सार सांगते.तसेच

तसेच जिंदगी इक सफर है सुहाना अंदाज या चित्रपटातील किशोर यांच्या तसेच आशा यांच्या ही आवाजतील अप्रतिम असे गाणे जीवन म्हणजे काय, हसत जगावे, कुणाची ही फिकीर करू नये, आलेला प्रत्येक क्षण जगावा
मरण कधीतरी येणारच म्हणून हसत जगावे हा संदेश देणार गीत.
अशी अनेक गाणी चित्रपटातुन चित्रित केली आहेत ज्या गीतातून जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक विचार मांडलेला दिसतो.

खरंच आयुष्य हे सहज सुंदर आहे,एक स्वप्न आहे अस वाटत, या स्वप्नात आपण खूप बागडतो, उंच भरारी घेतो पण स्वप्न आहे हे कळताच जागे होतो.
आयुष्य म्हणावे तितके खरंच सरळ सोपे नाही, एखाद्या व्यक्तीचे आयुष्य अगदी त्याच्या मनासारखे असते पण असंख्य लोकांचे आयुष्य खडतर, काट्याकुट्यांनी भरलेले असते, सरळ साधे जीवन देवाकडे मागितले तरी त्याला खूप त्रास आयुष्यात सहन करावा लागतो,
माणसाचा हव्यास कधी संपत नाही आपली एक मनोकामना पुरी झाली की दुसरी मनोकामना डोके वर काढते त्यामुळे माणूस सारे असूनही दुःखी होतो, इतरांशी तुलना करू लागतो त्याच्या कडे गाडी, बंगला आहे विपुल पैसा आहे माझ्या कडे नाही हे दुःख त्याला त्रास देते, मग कशात ही लक्ष लागत नाही यामुळे असुया निर्माण होते व त्या व्यक्तीचे आयुष्य नरक बनते.

कष्ट करुन काही माणसं यशस्वी होतात पण काहींना वारसा हक्काने सार मिळत पण जे मिळाले त्याचे त्याला काही नसते पण आपण कुणीतरी खूप मोठे आहोत हा अहंकार मात्र त्याचात निर्माण होतो, इतरांना तो तूच्छ लेखतो, काम धाम काही करत नाही फक्त आळस बाळगून आयुष्य घालवतो या जगण्याला काहीच अर्थ नसतो.

जगण्याची एक कला आहे. आयुष्य हे चढउतार यांनी भरले आहे, सुख दुःख, संकट यांनी ह्या भरलेल्या आयुष्यात न डगमगता
जो पुढे पुढे चालतो, मेहनतीने जो आपले आयुष्य सिद्ध करतो तो खरा माणूस, स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला आयुष्यात खूप काही भोगावे लागते ते भोगून आयुष्य हसत खेळत जो घालवतो त्याला आयुष्य म्हणजे काय कळले. तोच जीवनाचे सार्थक करतो अशा माणसांचा सारेच आदर करतात, सन्मान देतात हे आयुष्य खरंच चांगले.

काही माणस आयुष्यात मला काही मिळाले नाही, आई बापाने का जन्माला घातले असे सरळ आई बापाला विचारतात
असे आई बाप हतबल असतात, मग अशी माणसं व्यसनाच्या आहारी जातात आपल्या तब्येती ची वाट लावतात, इतरांना दोष देत आयुष्य नासाडी करायचे व जीवन संपवायचे अशा माणसाचा ना घरच्यांना उपयोग होत ना समाजाला अशा जीवनाचा काय उपयोग. नाहक घरातील व्यक्तीना मनस्ताप, असे आयुष्य कुणाचे ही असू नये असे मला वाटते.

आयुष्य कस असावं
सार्थकतेने भरलेल
उदात्त हेतूनी साऱ्यांना
समावून घेतलेल