Home Breaking News Varora taluka@ news • झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण समारंभ ! •...

Varora taluka@ news • झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण समारंभ ! • वेदनेवर फुंकर घालून हास्य निर्माण करणारे साहित्य तयार व्हावे – डॉ .विकास आमटे

406

Varora taluka@ news
• झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण समारंभ !
• वेदनेवर फुंकर घालून हास्य निर्माण करणारे साहित्य तयार व्हावे – डॉ .विकास आमटे

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :जगातील वंचितांच्या व दुःखीतांच्या वेदनेवर जेव्हा साहित्यातून फुंकर घालून चेह-यावर आनंद निर्माण होईल तेव्हाच साहित्यिकाला समाधान वाटले पाहिजे,असे साहित्य तयार साहित्यिकांच्या लेखणीतून उतरले पाहिजे असे प्रांजळ मत कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.विकास आमटे यांनी व्यक्त केले. झाडीबोली साहित्य मंडळ,चंद्रपूर व वरोरा शाखेतर्फे आयोजीत केलेला झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण समारंभ पुस्तक प्रकाशन व पुस्तक लोकार्पण सोहळा निमित्ताने निजबल इमारत संधी निकेतन आनंदवन वरोरा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.हा आयोजित देखणा,नेत्रदीपक सोहळा दिग्गज मान्यवर व जिल्हाभरातील साहित्यिकांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी डॉ.विकास आमटे हे उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून नाट्यकलावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बंडोपंत बोढेकर यांनी विभूषित केले होते.आयोजित या सोहळ्याला आचार्य ना.गो.थुटे,सुधाकर कडू,रत्नमाला भोयर,अरुण झगडकर पंडीत लोंढे आदिं मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.झाडीबोली वरोराच्या वतीने यावेळी मान्यवरांचा सत्कार सन्मानचिन्हासह करण्यात आला.
सु.वि.साठे लिखित “गीतांगण” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तर “बंध सबंध” या ना.गो.थुटे लिखित काव्यसंग्रहाचे लोकार्पण याच सोहळ्यात पार पडले.भाष्यकार म्हणून भाष्य मदनराव ठेंगणे व सुभाष उसेवार यांनी आपल्या सुक्ष्म परिक्षणातून भाष्य केले.जिल्ह्यातील साहित्य व समाजकार्यात विशेष कार्य करणां-या १६ साहित्यिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला त्यात “झाडी विशेष गौरव पुरस्कार” आनंदवनचे दिव्यांग साहित्यिक रमेश बोपचे, प्रा. नामदेव मोरे (चंद्रपूर),प्रकाश कोडापे(चिमूर ),जयंत लेंजे(सिंदेवाही),शितल कर्णेवार(राजुरा),सुनील बावणे (बल्लारपूर),मंगला गोंगले(सावली),वृंदा पगडपल्लीवार (मुल),डॉ.अर्चना जुनघरे (जिवती),सुजित हुलके(पोंभुर्णा) ,संगीता बांबोळे (गोंडपिपरी),धनंजय पोटे (ब्रह्मपुरी),महादेव हुलके (कोरपना),वंदना बोढे (भद्रावती),विजय भसारकर (वरोरा) आदींना शब्दसाधक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले तर रमेश बोपचे (आनंदवन), विनोद देशमुख (घाटकुळ), संतोष मेश्राम (ब्रम्हपुरी) यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले संधीनिकेतनचे अधिक्षक रवींद्र नलगिंटवार , माधव कौरासे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने व सेवाकार्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. पुरस्कार घोषित मान्यवरांचा सन्मान,आनंदवन निर्मित शाल,पुष्पपात्र सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आनंदवन संधी निकेतन अधिक्षक रविद्र नलगिंटवार यांचे तर्फे पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.शाखेचे ज्येष्ठ सदस्य माधव कौरासे यांचा वाढदिवसप्रसंगी शाखेतर्फे सन्मान करण्यात आला.
आनंदवन येथील संधी निकेतनचे अधिक्षक तथा मंडळाचे रविंद्र नलगिंटवार, दीपक शिव,रमेश बोपचे,अश्विनी मुकेश पिंपरे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमातून, सहकार्यातून हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याला आनंदवन परिवाराकडून उपहाराची व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.
ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडीत लोंढे यांनी केले तर सुत्रसंचालन दीपक शिव व चंद्रशेखर कानकाटे यांनी केले .उपस्थितीतांचे आभार भारती लखमापुरे यांनी मानले.कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली होती.