Home Breaking News Bhadrawati taluka@news •‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियानाच्या पुर्वतयारीसाठी बैठका •...

Bhadrawati taluka@news •‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियानाच्या पुर्वतयारीसाठी बैठका • ओबीसी महामोर्चाच्या समर्थनार्थ १७ सप्टेंबरची बैठक १८ सप्टेंबरला

84

Bhadrawati taluka@news
•‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियानाच्या पुर्वतयारीसाठी बैठका
• ओबीसी महामोर्चाच्या समर्थनार्थ १७ सप्टेंबरची बैठक १८ सप्टेंबरला

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात लवकरच वरोरा व भद्रावती तालुक्यात शिवसेना  पक्षांतर्गत ‘होऊ द्या चर्चा..!’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शिवसैनिक थेट जनतेशी संवाद साधणार आहे. या संवादातून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
    ‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियान  प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने  नियोजन करण्यासाठी वरोरा -भद्रावती विधानसभा पदाधिकारी व शिवसैनिक बंधू -भागिनिंच्या महत्वपूर्ण बैठका आयोजित केलेल्या आहे. भद्रावती येथे श्री. मंगल कार्यालयात   दि. १६ सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता  तसेच वरोरा येथे पक्षाच्या ‘शिवालय’ मध्यवर्ती कार्यालयात यापूर्वी दि. १७ सप्टेंबर रोज रविवारला आयोजित केलेली बैठक याच दिवशी ओबीसी मोर्चा असल्याने रद्द केली आहे. सदर बैठक दि. १८  सप्टेंबर रोज सोमवारला वरोरा येथे पक्षाच्या ‘शिवालय’ मध्यवर्ती कार्यालयात दुपारी बारा वाजता घेण्याचे ठरले आहे. दिनांक १७ सप्टेंबरला चंद्रपूर येथे ओबीसी महामोर्चा असल्याने त्यादिवशी होणारी सभा ही १८ सप्टेंबरला पुढे करण्यात आली आहे, हे विशेष.

भद्रावती व वरोरा येथील दोन्ही  बैठकांचे आयोजन वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. याप्रसंगी दोन्ही तालुक्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसेना, शिवसेना महीला आघाडी, युवा- युवती सेना व सर्व शाखांचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख व सर्व शिवसैनिक बंधू-भगिनी उपस्थित राहतील. या दोन्ही बैठकीत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी जेष्ठ पदाधिकारी यांनी या बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर व भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांनी केले आहे, असे प्रसिध्दी प्रमुख रवि कावळे, किशोर उत्तरवार व जेष्ठ शिवसैनिक माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांनी कळविले आहे.