Home Breaking News Chandrapur city news • रविंद्र टोंगेंच्या अन्नत्याग आंदोलनाला कुणबी युवा चंद्रपूर...

Chandrapur city news • रविंद्र टोंगेंच्या अन्नत्याग आंदोलनाला कुणबी युवा चंद्रपूर संघटनेचे जाहीर समर्थन ! • मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही!

180

Chandrapur city news
• रविंद्र टोंगेंच्या अन्नत्याग आंदोलनाला कुणबी युवा चंद्रपूर संघटनेचे जाहीर समर्थन !

• मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: मागील पाच दिवसांपासून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. तसेच ओबीसींच्या रखडलेल्या विषयांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन चंद्रपूरात करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा मराठा समाजाला जर कुणबी मधून ओबीसी आरक्षण दिले गेले. तर ओबीसी मधील जवळपास अडीच ते तीन हजार जातीतील विद्यार्थ्यांना वरती हा अन्याय होईल म्हणून या रास्त मागणीला घेऊन ते उपोषण करीत आहे .त्यांच्या या उपोषणाला आज कुणबी युवा चंद्रपूर संघटनेकडून जाहीर समर्थन तथा पाठिंबा देण्यात आले. तसेच ओबीसी समाजाला शासनाने कमजोर समजू नये. जर ओबीसी समाजाविरुद्ध चुकीचे निर्णय घेण्यात आले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात गंभीर उमटतील याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी . असा इशारा कुणबी युवा चंद्रपूर तर्फे देण्यात आला या वेळी युवा जिल्हा समन्वयक राजू कुडे, संदेश खडसे, ॲड. प्रफुल मुरकुटे, सुप्रीत कुडे, विश्वनाथ पाल, सुधीर पिंगे, दिनेश देरकर, मोहन दरेकर तसेच अनेक युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.