Ballarpur city @news
• भाजपा नेते काशीनाथ सिंह यांच्या नेतृत्वात शहरातील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपुर:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह यांच्या नेतृत्वात बल्हारपूर शहरातील काही तरुणांनी भाजपात प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर परिषद चौक, बल्लारपूर येथे आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान समीर खान यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला .या वेळी वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व भाजपा जिल्हा अध्यक्ष ग्रामीणचे हरिष शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत युवकांनी हा प्रवेश घेतला. या वेळी भाजपा शहर महासचिव मनीष पांडे, महिला मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका दुधे, महिला शहर अध्यक्षा वैशाली जोशी, कांता ढोके, आरती अक्केवार, सारिका कनकम, दीपमाला यादव, अजहर शेख, आशिष चावडा , भाजपाचे जेष्ठ नेते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेश घेणा-यां मध्ये प्रामुख्याने समीर खान, एजाज शेख, अयान शेख, शोएब शेख, कलाम शेख, बाबा शेख आकिब शेख, मिलाप नगराळे, महेश गोला, तुषार रणदिवे, रोहन वाघाडे, मनीष काकापल्ली करण पेंदे यांचा समावेश आहे.


