Home Breaking News Bhadrawati taluka@news • ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलन व...

Bhadrawati taluka@news • ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलन व उद्या (दि.२३) ला होणाऱ्या रस्ता जाम आंदोलनात सहभागी व्हा : रविंद्र शिंदे

109

Bhadrawati taluka@news
• ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलन व उद्या (दि.२३) ला होणाऱ्या रस्ता जाम आंदोलनात सहभागी व्हा : रविंद्र शिंदे

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :ता. प्र.भद्रावती

भद्रावती : मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये या प्रमुख मागणीसह इतर प्रचलित तथा प्रलंबित मागण्यांकरीता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात तथा ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या (दि.२३) ला होणाऱ्या रस्ता जाम आंदोलनात सर्व ओबीसी बांधवांनी सहपरिवार सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

आज (दि.२२) ला सदर उपोषणस्थळी श्री. रवींद्र टोंगे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विद्यार्थी ओबीसी महासंघ , चंद्रपूर यांचे शुगर व बीपी लो झाल्याने त्यांना पुढील उपचारकरीता दि. २२/०९/२०२३ रोजी ११.३० वाजता सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे हलविण्यात आलेले असून सदर उपोषण स्थळी श्री. रविंद्र टोंगे यांचे ऐवजी आजपासून (दि.२२) श्री. विजय पांडुरंग बलकी, वय ६३ वर्षे, माजी सभापती पंचायत समिती, चंद्रपूर तथा ग्रामपंचायत सदस्य वेरूर रा. मुक्काम वेरुर पोस्ट ताडाली तालुका, जिल्हा चंद्रपूर हे सदर अन्नत्याग उपोषणाकरिता बसलेले आहेत. 

त्यानंतर दुपारी मातोश्री शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत असे ठरले की उद्या दिनांक २३ सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता जनता कॉलेज चौक, चंद्रपूर येथे रस्ता जाम आंदोलन करायचे सर्वानुमते ठरले. तरी या रस्ता जाम आंदोलनात सर्व ओबीसी समाजाने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सदर उपोषण स्थळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर सर्व ओबीसी जातीय संघटनेचे पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन राजूरकर, पुरुषोत्तम सातपुते अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज ,चंद्रपूर, पप्पू देशमुख, अध्यक्ष जनविकास सेना संघटना, चंद्रपूर, राजेश बेले, प्रा. श्याम लेडे, मनीषा बोबडे, गोमती पाचभाई, दिनेश चोखारे, सदस्य, बाजार समिती, चंद्रपूर आदी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.