Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस शहरातील जनता कॉन्व्हेन्ट येथे तान्हा पोळा उत्साहाने...

Ghugus city @news • घुग्घुस शहरातील जनता कॉन्व्हेन्ट येथे तान्हा पोळा उत्साहाने साजरा

69

Ghugus city @news
• घुग्घुस शहरातील जनता कॉन्व्हेन्ट येथे तान्हा पोळा उत्साहाने साजरा

✍️पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आणि शेतकऱ्याचा जिवलग मित्र वृषभ म्हणजे बैल,या बैलाच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा, लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार रुजावे म्हणून तान्हा पोळा साजरा केला जातो. जनता कॉन्व्हेंट स्कुल घुग्घुस येथे सुद्धा विद्यार्थी,विद्यार्थींनी या सणाचे महत्व समजावे म्हणून एका अप्रतिम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बालक,बालिकांनी शेतकरी पोशाख परिधान करून नंदी बैलाची पूजा करत कृतज्ञता व्यक्त केली.
आयोजित केलेल्या सजावट स्पर्धेत विराज अतिश झाडे, मंजरी शंकर डोंगरकर, तिलोत्तमा सुरज कावेरी, त्रिशा नितेंद्र मेश्राम यांनी प्रथम क्रमांक तसेच ईशान मुकेश बावणे, लावण्या संतोषसिंग चंदेल,अरशान मोहम्मद शेख, यामिनी प्रकाश दानवे यांनी द्वितीय क्रमांक पटकावीला तर अनुश किशोर टोगारे,कार्तिक अरविंद तरारे यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. चिमुकल्या तन्मय गणेश घुमे, प्रश्नार्थ प्रितम कुमार पाटील,राघवी राजू अडबाले, लावण्या लबसेश लेनगुरे, आदित्य किशोर टोगारे, रुद्र मुकेश दडमल, जय विनायक उईके, काव्याशी प्रफुल डोंगरकर यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजन शाळेच्या शिक्षिका ज्योती कांबळे,मनीषा कोटावार,प्रियांका सुरजुसे यांनी साकारली. परीक्षक म्हणून किर्ती खैरे शिक्षिका यांनी काम पहिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिक्षिका सौ. सुनंदा बावणे,प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी सहायक शिक्षिका कु.निशा रामटेके तसेच श्री.रणजित यादव सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु.स्वाती बुच्चे शिक्षिका तर आभार रोजमेरी झीलकर शिक्षिंकानी मानले.
या आधुनिक जगात आपली संस्कृती आपण टिकविली पाहिजे असे आव्हान कार्यक्रमच्या अध्यक्षा सौ. सुनंदा बावणे यांनी केले. प्रमुख पाहुण्या कु.निशा रामटेके आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाल्या की, भारतीय संस्कृती ही जगातील एकमेव संस्कृती आहे जी निसर्गाचा, प्राणी पक्षांचा तसेच नदी पर्वतांचा आदर आपल्या सनाद्वारे साजरा करतो.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेच्या सेविका संगीता पेठकर, संगीता खाडे, संगीता समर्थ,मंगला नागतुरे यांनी परिश्रम घेतले.