Home Breaking News Bhadrawati taluka@news • कमलेश बारस्कर यांनी घेतली शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रसिध्दी प्रमुख...

Bhadrawati taluka@news • कमलेश बारस्कर यांनी घेतली शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रसिध्दी प्रमुख आशिष ठेंगणे यांची भद्रावती येथे भेट

102

Bhadrawati taluka@news
• कमलेश बारस्कर यांनी घेतली शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रसिध्दी प्रमुख आशिष ठेंगणे यांची भद्रावती येथे भेट

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र. भद्रावती

भद्रावती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने व किरण पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे सूचनेनुसार व नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे मार्गदर्शनात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे कमलेश बारस्कर यांनी आज वरोरा विधानसभा क्षेत्रातील भद्रावती येथे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर आशिष ठेंगणे यांची भेट घेऊन भद्रावती तालुक्यातील व भद्रावती शहरातील शिवसेनेच्या पक्ष बांधणी संदर्भात विशेष चर्चा करून भद्रावती शहर व तालुक्यात शिवसेना अजून जोमाने कशी वाढविता येईल याविषयी जिल्हा परिषद क्षेत्र वाईज तथा येणाऱ्या भद्रावती नगरपालिका निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षाची काय भूमिका राहील याची सविस्तर माहिती आशीष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांच्याकडून घेतली.

तालुक्यातील कोंडा – घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्र मांजरी – पाटाळा जिल्हा परिषद क्षेत्र, चोरा – चंदनखेडा जिल्हा परिषद क्षेत्र नंदुरी – कोकेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र, कोंढा – घोडपेठ क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख सुंदर सिंग बावरे, माजरी -पाटाळा क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख मदन भाऊ चिकवा तसेच चोरा -चंदनखेडा जिल्हा परिषद क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख सिंगल दीप भाऊ पेंदाम,नांदुरी कोकेवाडा क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख भाऊराव घागी यांनी दिलेली सविस्तर माहिती आशिष ठेंगणे यांनी कमलेश बारस्कर यांना दिली .

त्यांना शिवसेना पक्ष वाढीसाठी काय काय उपाययोजना करता येईल याची माहिती दिली . तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व माहीती पुस्तिका त्यांच्याकडे सोपवून भद्रावती तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावे त्याचप्रमाणे शाखाप्रमुख व शिवदूत, बुथ प्रतिनिधी यांची नेमणूक करावी अशा मोलाच्या सूचना त्यांनी दिल्या .यावेळी कमलेश बारस्कर यांनी भद्रावती शहर प्रमुख पप्पू सरवण यांची सुद्धा भेट घेऊन पक्ष वाढी संदर्भात सूचना दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या जनकल्याणाच्या विविध योजना लागू केल्या त्या सर्व योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य करावे अशा सूचना आशिष ठेंगणे यांना त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये दिल्या यावेळी आशिष ठेंगणे यांच्या निवासस्थानी उपस्थित सिंगलदीप पेंदाम उपतालुका प्रमुख चोरा – चंदनखेडा, मनीष बूच्चे उपशहर प्रमुख भद्रावती,चेतन घोरपडे उप शहर प्रमुख भद्रावती, शिवम पारखे यांची उपस्थिती होती