Home Breaking News Bhadrawati taluka@news • गोंडवाना विद्यापीठात वार्षिक बृहत आराखडा सादर करण्याकरिता मुदतवाढ...

Bhadrawati taluka@news • गोंडवाना विद्यापीठात वार्षिक बृहत आराखडा सादर करण्याकरिता मुदतवाढ द्या •विवेकानंद ज्ञानपीठ, (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांची मागणी

74

Bhadrawati taluka@news
• गोंडवाना विद्यापीठात वार्षिक बृहत आराखडा सादर करण्याकरिता मुदतवाढ द्या
•विवेकानंद ज्ञानपीठ, (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांची मागणी

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र.भद्रावती

भद्रावती : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने नुकतीच शैक्षणिक सत्र २०२४-२५ पंचवीस करिता नवीन महाविद्यालये, नवीन अभ्यासक्रम, नवीन विद्याशाखा, नवीन विषय, अतिरिक्त तुकडी व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या अंतर्गत २०१६ च्या कलम १०७ (१) मधील तरतुदीनुसार आगामी नवीन शैक्षणिक सत्रासाठी तयार करण्यात येणाऱ्या वार्षिक बृहत आराखड्यास (प्रोस्पेक्टिव्ह प्लॅन) येत्या दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत सादर करावे अशी जाहिरात २४ सप्टेंबरला वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आहे.
परंतु विद्यापीठाने दिलेली मुदत खूपच अल्प असल्यामुळे प्रस्ताव सादर करण्यास संस्था ,महाविद्यालयांना अडचणी येणार आहेत. तरी या अडचणीचा विचार करत वार्षिक बृहत आराखडा विद्यापीठात सादर करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने मुद्दत वाढवून द्यावी अशी मागणी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी केली आहे.