Ballarpur dist@ news
•राजुरा नदीच्या पुलावरून दुचाकीसह खाली पडून गर्भवती महिलेचा मृत्यू तर चार वर्षिय बालकाचा प्राण बचावला !
•चिमुकला- अख्खी रात्र आईच्या मृतदेहाला चिकटून अश्रू ढाळत होताय ….!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
बल्लारपूर :- बुधवार दिवस !वेळ सायंकाळी सात वाजण्याची ! आदित्य प्लाझा बामणी येथील ती मूळ रहिवाशी सुषमा पवन काकडे !वय वर्ष ३९! सदरहु महिला आपल्या चार वर्षाच्या मुला साठी चॉकलेट घेण्यासाठी दुचाकी मोपेडवरून घरातून निघाली होती. बामणीहून राजुरा येथे जात असताना , दुचाकीचा तोल गेल्याने वर्धा नदीत पुलावरून ती खाली कोसळली. या दुदैवी घटनेत गरोदर महिलेचा मृत्यू झाला, तर चार वर्षाच्या बालकाचा जीव वाचला. निरागस बालक रात्रभर आईचा मृतदेहला चिकटून ढसढसा रडत बसला होता. आज पहाटे पाच वाजता पुला खालून मुलाचा रडण्याचा आवाज कुटुंबीयांना ऐकू आल्याने त्यांनी खाली जाऊन बघितले असता सुषमाचा मृत्यू झाला होता तर चार वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली होती.बालकावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी सुषमा काकडे यांना मृत घोषित केले.
या मृतक महिलेचा पती पवन काकडे पंजाब नॅशनल बँकेत कर्मचारी आहे, सुषमा देवीच्या दर्शनासाठी बामणीत आल्याची माहिती समोर आली आहे, असे काय घडले की बामणीहून घरी न जाता, राजुरा दिशेला जाण्याची तिला गरज का पडली? वर्धा नदी पुलावर हा अपघात कसा झाला? या बाबत पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतरच अनेक प्रश्नांची उत्तरे उकलण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा कुटुंबियांकडून पोलिस स्टेशन येथे महिला मिशिंगची रिपोर्ट दिल्या गेली. मोबाईल लोकेशन राजुरा दिशेने दिसल्यामुळे अख्खे कुटुंबीय व पोलिस विभाग मागावर होते. बल्लारपूर पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.