Home Breaking News Chandrapur dist@ news • शिक्षण व नोकरी वाचविण्यासाठी आज चंद्रपूर शहरात...

Chandrapur dist@ news • शिक्षण व नोकरी वाचविण्यासाठी आज चंद्रपूर शहरात निघतोय विराट जनआक्रोश मोर्चा!

179

Chandrapur dist@ news
• शिक्षण व नोकरी वाचविण्यासाठी आज चंद्रपूर शहरात निघतोय विराट जनआक्रोश मोर्चा!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणे बंद करावे, जिल्हा परीषदेच्या शाळेचे खाजगीकरण करु नये तसेच अंशदायी पेन्शन योजना NPS रद्द करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने शिक्षण व नोकरी बचाव समिती, चंद्रपूरच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 ला दुपारी 12.00 वाजता जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती दिपक जेऊरकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज दिली.हा जनआक्रोश मोर्चा दिक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका
येथून निघेल. सदरहु जनआक्रोश मोर्चाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूरचा पाठींबा असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा व शासकीय कर्मचारी, शिक्षक यांचा प्रामुख्याने यात सहभाग राहणार आहे. बाह्ययंत्रणेमार्फत सुरु केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, NPS रद्द करुन शिक्षक-राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, MPSC व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन केवळ शंभर रुपये ठेवावे, IBPS/TCS किंवा इतर खाजगी संस्थांमार्फत विविध पदाच्या स्पर्धा परीक्षा न घेता सर्वा परीक्षा MPSC आयोगाव्दारे घेण्यात याव्या, विविध शासकीय पदभरती साठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा,विद्यार्थी हितासाठी 20 पटाखालील शाळा बंद होऊ नयेत यासाठी समुह शाळा संकल्पना रद्द करणे, राज्य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदे व अनुदानित संस्थेमधिल शिक्षक प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत आदीं विविध मागण्यांसाठी या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजित जनआक्रोश मोर्चात विद्यार्थी, पालक, जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परीषद कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून आपल्या हक्क व अधिकारासाठी लढा द्यावा असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजु धांडे, कोषाध्यक्ष संतोष अतकारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.