Home Breaking News Korpna taluka @news • कोरपना तहसील कार्यालयावर धडकला विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विराट...

Korpna taluka @news • कोरपना तहसील कार्यालयावर धडकला विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा

38

Korpna taluka @news
• कोरपना तहसील कार्यालयावर धडकला विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा

!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

कोरपना : तालुका शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी , शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष यांच्या वतीने आज शुक्रवारला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा शेतकरी नेते तथा माजी आमदार अधिवक्ता वामनराव चटप यांचे नेतृत्वात स्थानिक कोरपना तहसील कार्यालयावर धडकला.

अतिवृष्टीत पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी , खरवडून गेलेल्या शेतीला एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, परसोडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे, शेती पंपाला पूर्ण दाबाचा वीज पुरवठा देण्यात यावा, केंद्र सरकारने विदर्भ राज्याची तातडीने निर्मिती करावी, गडचांदूर आदिलाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात यावे, जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण करू नये आदिंसह पंधरा मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी कोरपनाचे तहसीलदार यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन देण्यात आले. सदरहु मोर्चात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले , माजी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, डॉ. भास्करराव मुसळे, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर, मदन सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे , अरुण रागीट,विकास दिवे, दशरथ बोबडे , शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अड श्रीनिवास मुसळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेश सातपुते , बंडू राजूरकर ,सुभाष तुरानकर , प्रवीण गुंडावार अनंता गोडे,भास्कर मत्ते ,रवी गोखरें, शब्बीर जहागीरदार
पद्माकर मोहितकर, रत्नाकर चटप , सचिन बोंडे, विजय धानोरकर यांच्यासह या भागातील शेतकरी – शेतमजुर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.