Home Breaking News Gadchiroli dist@ news •माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी जाणल्या...

Gadchiroli dist@ news •माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी जाणल्या उपोषणकर्त्यांचा मागण्या ! •मागणी लवकरच मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

76

Gadchiroli dist@ news
•माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी जाणल्या उपोषणकर्त्यांचा मागण्या !

•मागणी लवकरच मार्गी लावण्याचे दिले आश्वासन! सुवर्ण भारत:शंकर महाकाली(मुख्यसंपादक)

सिरोंचाः-सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर, मेडाराम, आदीमुत्तापूर, नंदीगाव, लक्ष्मीपूर, व अमरावती या गावातील शेतकऱ्यांचे शेतीचे लोडशेडिंग बंद करण्यात यावे या मागणीसाठी सिरोंचा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व लवकरच या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
गेल्या एक वर्षांपासून महावितरण कंपनीकडून नारायणपूर भागात भारनियमन प्रक्रिया सुरू आहे. दिवसातून केवळ ८ तास विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे मेडाराम, नारायणपूर, आदीमुत्तापूर, नंदीगाव, लक्ष्मीपूर, व अमरावती या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. या भागातील शेतकऱ्यांच्या धान,मिरची, कापूस इत्यादी पिकांची माठया प्रमाणात नुकसान होत आहे,
लोडशेडिंग बंद करून २४ तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी संबंधित विभागाला शेतकऱ्यांनी अनेकदा करूनही लोडशेडिंग प्रक्रिया बंद करण्यात आली नाही. यामुळे मागणी पुर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
आज माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपात जावून शेतकऱ्यांना तुमचा मागणी मी कॅबिनेट मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना कळविणार असून तुमचा मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या समवेत तालुका अध्यक्ष मधुकर कोलुरी, विश्वेश्वरराव काँड्रा, माजी नगर सेवक रवि रालाबंडीवार, नागेश गागापूरवार, जिल्हा उपाध्यक्ष व्येंकटलक्ष्मी आरवेल्ली, नगर सेविका सपना तोकला, जानमपल्ली ग्राम पंचायत चे उपसरपंच नागराज गणपती,रवि सुलतान, देवय्या येनगांदुला, मदनय्या मादेशी उपस्थित होते. भाग्यश्री आत्राम यांनी भेट दिल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.