Home Breaking News Chandrapur dist@ news • येत्या 17 नोव्हेंबरला चंद्रपूरात धडक मोर्चाचे आयोजन !

Chandrapur dist@ news • येत्या 17 नोव्हेंबरला चंद्रपूरात धडक मोर्चाचे आयोजन !

293

Chandrapur dist@ news
• येत्या 17 नोव्हेंबरला चंद्रपूरात धडक मोर्चाचे आयोजन !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने येत्या 17 नोव्हेंबरला स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती रविन्द्र उमाठे यांनी आज दिली.

गेल्या अठरा वर्षांपासून अनेक आरोग्य अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करत आहे . कोरोना काळात अनेक महत्त्वाचे काम या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले असून जागतिक आरोग्य संघटनेकडून भारत सरकारला जागतिक पुरस्कार मिळाला आहे.
तरीही शासनाने या अधिकारी व कर्मचारी वर्गांचा छळ लावला आहे ,असे परखड मत आज आरोग्य विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे .राज्य सरकारने कंत्राटी कर्मचारी यांना समायोजन करुन कायम स्वरुपाची नोकरी द्यावी .
व ज्या कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन करता येत नाही .त्यांना समान काम समान वेतनवाढ द्यावे .
सरकारने समायोजन कृती समितीला लेखी पत्र दिले होते कि मार्च २०२३ पर्यंत सर्वांना समायोजित करण्यात येईल परंतु सरकारने आपला शब्द पाळला नाही .त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी हे बेमुदत संपात सहभागी झाले आहे .
त्याचाच एक भाग म्हणून दि. १७ नोव्हेंबर २०२३ला चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालावर धडक मोर्चाचे आयोजन केले असल्याचे मुख्य समन्वयक यांनी रविन्द्र उमाठे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे . दरम्यान आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँ .प्रकाश रेड्डी ,अंकुश वाघमारे, पि. एम. गोटे ,डॉ शिल दुधे ,डॉ .तुषार अगडे ,डॉ .अक्षय बुरलावार , वनिता मेश्राम , ललिता मुत्यालवार ,आराधना झाँ ,शालिनी वनकर ,जया मैंदळकर,रोशना एटलावार ,मंदा बनकर , डॉ. तिरथ उराडे ,डॉ. विनोद फुलझेले , सूरज डुकरे ,डॉ .प्राची रोडे यांनी केले आहे .