Home Breaking News Chandrapur city@ news •एक रुपयाचा कडीपत्ता शासन झालं बेपत्ताच्या जोरदार घोषणाबाजीने चंद्रपूर...

Chandrapur city@ news •एक रुपयाचा कडीपत्ता शासन झालं बेपत्ताच्या जोरदार घोषणाबाजीने चंद्रपूर शहर दुमदुमले! •कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चाने वेधले अनेकांचे लक्ष ! • मोर्चाने दिली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ! •जो पर्यंत मागण्यां पूर्ण होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही-रविंद्र उमाठे

163

Chandrapur city@ news
•एक रुपयाचा कडीपत्ता शासन झालं बेपत्ताच्या जोरदार घोषणाबाजीने चंद्रपूर शहर दुमदुमले!
•कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चाने वेधले अनेकांचे लक्ष !
• मोर्चाने दिली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक !
•जो पर्यंत मागण्यां पूर्ण होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही-रविंद्र उमाठे

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून महाराष्ट्रभर कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून अद्यापही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्याचे दिसून येत नाही.दरम्यान आज सोमवारला चंद्रपूरच्या मुख्य मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजळून दुपारी बारा वाजता” एक रुपयाचा कडीपत्ता शासन झालं बेपत्ता अश्या जोरदार घोषणा देत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांचा एक विराट आक्रोश मोर्चा निघाला.या भव्य मोर्चाचे नेतृत्व रविन्द्र उमाठे यांनी केले.सदरहु मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों आरोग्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.मुख्य मार्गाने निघालेल्या सदरहु मोर्चाने चंद्रपूरकरांचे अक्षरशः लक्ष वेधले होते.शासन व प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी हा मुळ उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सरसकट समायोजन करा आणि समान काम समान वेतन त्यांना द्या! या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी यांचे मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असून अनेक सामाजिक सामाजिक संघटनांनी या सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे .

जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही असा निर्धार या आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविन्द्र उमाठे यांनी केला आहे.

आरोग्य विभागात आपले कर्तव्य बजवणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तीन ते चार आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. परंतु शासनाने अद्याप यावर योग्य तोडगा काढला नाही.आंदोलनामुळे त्यांच्या गैरहजेरीत काम करण्याऱ्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा व्याप आल्याने त्याचा परिणाम सामान्य जनतेवर पडत आहे .अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे

क्षुल्लक मागण्यांसाठी आरोग्य सेवा देणारे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे. त्यांच्या मागण्या या रास्त असून गेल्या 18 वर्षांपासून ते कंत्राटी म्हणुन काम करीत आहे. समायोजन सोबत समान काम समान वेतन देण्यात यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे.आज या आंदोलनाचा २५ वा दिवस असून मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास या ही पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविन्द्र उमाठे यांच्यासह कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.दुपारी ४वाजता हा आक्रोश मोर्चा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यानंतर आंदोलनस्थळी एक भव्य सभा पार पडली अनेकांनी या सभेला मार्गदर्शन केले.संध्याकाळी एका शिष्टमंडळाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे एक निवेदन दिले.