Home Breaking News Chandrapur@city news • आ.किशोर जोरगेवारांनी दिल्या उत्तर भारतीय बांधवांना छठ पूजेच्या शुभेच्छा...

Chandrapur@city news • आ.किशोर जोरगेवारांनी दिल्या उत्तर भारतीय बांधवांना छठ पूजेच्या शुभेच्छा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केले मिठाईचे वाटप !

158

Chandrapur@city news
• आ.किशोर जोरगेवारांनी दिल्या उत्तर भारतीय बांधवांना छठ पूजेच्या शुभेच्छा
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केले मिठाईचे वाटप !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:उत्तर भारतीयांचा पवित्र सण असलेल्या छठ पुजेचे आज चंद्रपूरातील विविध घाटांवर आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सदरहु घाटांवर उपस्थिती दर्शवित छठपूजेत सहभाग नोंदविला. आ.जोरगेवार यांनी उत्तर भारतीयांना पवित्र छठ पूजा पर्वाच्या या वेळी शुभेच्छा दिल्यात. तसेच या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले.
यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजीत शाहा, यंग चांदा ब्रिगेडच्या विधी विभागाचे जिल्हा अध्यक्ष अधिवक्ता परमहंस यादव, चंद्रमा यादव, ताहिर हुसेन, क्रिष्णा यादव, सुदामा यादव, हरिनाथ यादव, दशरथ मिठ्ठावार, गोरंग पाल, राजेश शिवधारी यादव, सुनिल सोनार, बिरेश शाहा, अक्षय मिस्त्री, जितु गुप्ता आदिंची या प्रसंगी उपस्थिती होती.
चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा असल्याने परप्रांतातील विविध धर्मीय नागरिक येथे स्थायी झाले आहे. यात उत्तर भारतीय समाजाचीही संख्या मोठी आहे. दरवर्षी येथे उत्तर भारतीयांचा पवित्र उत्सव असलेल्या छठ पुजेचे मोठ्या उत्साहात आयोजन केल्या जात असते. यंदा ही उत्तर भारतीय समाजाच्या वतीने चंद्रपूरातील विविध घाटांवर छठ पुजेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आमदार जोरगेवार यांनी लालपेठ शिव मंदिर घाट, पागल बाबा नगर घाट, लालपेठ घाट या सह शहरातील विविध घाटांवर उपस्थिती दर्शवित छठ पुजेत सहभाग घेतला. यावेळी सुर्याला अर्घ अर्पण करुन आमदार जोरगेवार यांनी पुर्जा अर्चना केली. या प्रसंगी आमदार जोरगेवार यांनी मिठाईचे वाटप करुन उत्तर भारतीयांना छठपुजा पर्वाच्या शुभेच्छा दिल्यात.