Home Breaking News Chandrapur dist@ news • समायोजनासाठी करतेय ” ते आंदोलन ” आंदोलनाचा आज...

Chandrapur dist@ news • समायोजनासाठी करतेय ” ते आंदोलन ” आंदोलनाचा आज 34 वा दिवस ! • जो पर्यंत मागण्यां पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे नाही; रविन्द्र उमाठेंचा निर्धार •शेकडों कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी

80

Chandrapur dist@ news
• समायोजनासाठी करतेय ” ते आंदोलन ” आंदोलनाचा आज 34 वा दिवस !
• जो पर्यंत मागण्यां पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे नाही; रविन्द्र उमाठेंचा निर्धार

•शेकडों कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे . आज (सोमवारी) या आंदोलनाचा 34 वा दिवस आहे.दरम्यान या आंदोलनस्थळाला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शनिवारी संध्याकाळी भेट देत त्यांच्या रास्त मागण्या जाणून घेतल्या व त्याच वेळी त्यांनी आपल्या संक्षिप्त भाषणातून आंदोलनकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.आपण आपल्या मागण्यां सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन आ.धानोरकर यांनी यावेळी बोलताना दिले . काही दिवसांपूर्वी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली होती.त्यांनी देखिल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपल्या मागण्या संदर्भात एक बैठक लावून त्यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले होते.सध्या सुरू असलेल्या आंदोलनामूळे शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे बोलल्या जात आहे.राज्यभर हे आंदोलन सुरू असतांनाच चंद्रपूर जिल्हा आंदोलनात नियमित सहभागी होणाऱ्या सावली ब्लाॅकच्या परिचारिका छाया पाठक यांची अचानकपणे प्रकृती बिघडली तर आंदोलन सुरू होण्यापूर्वि नाशिक विभागाच्या एक परिचारिका प्रतिभा पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने अद्याप लक्ष पुरविले नाही.त्यामुळे आंदोलनकर्त्यांत शासनाविरुध्द नाराजीचे सुर उमटल्याचे एकंदरीत दिसून येते.
चंद्रपूर जिल्ह्यातील याच आंदोलनकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी विविध प्रकारचे आंदोलन करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले हे येथे उल्लेखनीय आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या सोडव्याव्यात अशी मागणी आता सर्व स्तरावरून होवू लागली आहे.समायोजन ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असून त्यांच्या आंदोलनाला जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी आपले समर्थन जाहीर केले आहे.

जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरू असलेले आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे मुख्य समन्वयक काॅम्रेड रविन्द्र उमाठे, डॉ.शिल दुधे, डॉ .अक्षय बुर्लावार, डॉ.तिरथ उराडे,डॉ.तुषार अगडे, डॉ.विनोद फूलझेले, काॅम्रेड प्रकाश रेड्डी, अधिवक्ता राम इंगळे, वनिता मेश्राम, आराधना झा, ललिता मुत्यलवार,जया मैंदळकर, शालिनी दुर्गे, रजनी धापटे, वैभव आत्राम, ज्योति आसुटकर,प्रकाश मामिडवार,सुरज डूकरे, डॉ.पुजा महेशकर, मर्सिस्टेला गजर , शिल्पा वाढई, डॉ.नितिन गायकवाड,अमरदिप पारखी, डॉ.ज्योति डांगे, शंकर संगमवार,त्रिरत्ना मेश्राम,व ज्योति तामगाडगे, भारती जुनघरे , श्रध्दा भगत , पुनम वावरे, ऐश्वर्या भागडे, दिपाली खिरडकर , राखी गेडाम,नेहा दूधे,पायल रोहणे, हर्षाली दुधपचारे, संगिता पिपरे, प्रदीप हंबर्डे यांच्यासह आंदोलनात उतरलेल्या शेकडों अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे.जर शासनाने आमच्या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही तर लवकरच हे आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविन्द्र उमाठे यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.