Home Breaking News Chandrapur dist@ news • गुटखा बंदी फक्त कागदावरच प्रहारचे अध्यक्ष सतीश बिडकर...

Chandrapur dist@ news • गुटखा बंदी फक्त कागदावरच प्रहारचे अध्यक्ष सतीश बिडकर यांचा आरोप • प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व गुटख्याच्या विक्रीवर होणार आता ‘प्रहार’ आक्रमक

100

Chandrapur dist@ news
• गुटखा बंदी फक्त कागदावरच प्रहारचे अध्यक्ष सतीश बिडकर यांचा आरोप

• प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व गुटख्याच्या विक्रीवर होणार आता ‘प्रहार’ आक्रमक

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:राज्यात प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू,गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असताना चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पान मटेरिअल व किराणा दुकानात याची मोठ्या प्रमाणात खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.’विक्रेते मस्त,व अन्न औषध प्रशासन पोलिस विभाग सुस्त’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून केवळ छोट्या तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करून आपले नाव मोठे करताना अधिकारी दिसतात .मात्र मोठ्या व्यवसायिकांवर कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्याचे आरोप करत तात्काळ तंबाखू गुटखा विक्री व विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करावी,अन्यथा प्रहार जनशक्ती पार्टी ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन करेल,असा इशारा ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी एका निवेदनातून नुकताच दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिवसा ढवळ्या खुलेआम तंबाखू व, गुटखा विक्री सुरू आहे.काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय विक्रेते चालवित आहेत.यामुळे भविष्यात वादविवाद,भांडणे,हाणामारी तसेच या तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.उपरोक्त सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून शहरात सुरू असलेल्या गुटखा,सुगंधित तंबाखू तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रहार जिल्हाध्यक्ष बिडकर यांनी केली आहे.दरम्यान यासंदर्भात जिल्हा औषध प्रशासन अधिकारी,जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रपूर,पोलिस निरीक्षक गडचांदूर,यांना निवेदन देण्यात आले असून या कडे कितपत संबंधित अधिकारी लक्ष देतात या कडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.