Home Breaking News •उपराजधानीत थाटात पार पडला पुरस्कार वितरण सोहळा! •पूनम कुथे “आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान...

•उपराजधानीत थाटात पार पडला पुरस्कार वितरण सोहळा! •पूनम कुथे “आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान “पुरस्काराने सन्मानित • सामाजिक कार्यात ठरले छोट्या पूनमचे योगदान मोलाचे!

157

•उपराजधानीत थाटात पार पडला पुरस्कार वितरण सोहळा!
•पूनम कुथे “आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान “पुरस्काराने सन्मानित
• सामाजिक कार्यात ठरले छोट्या पूनमचे योगदान मोलाचे!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

गडचिरोली:नागपूरच्या पवार सभागृहात “ग्लोबल इंटरनॅशनल फॉउंडेशन टीम, दिल्ली (G.I.F.T.)” संस्थेच्या वतीने नुकताच भव्य दिव्य एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला .या पुरस्कार सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, पर्यावरण अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील ५० व्यक्तींची विशेष निवड करण्यात आली होती.मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत त्यांना “आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.दरम्यान या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील देसाईगंज (वडसा)तालुक्यातील पोटगांवच्या मूळ रहिवाशी असलेल्या कु.पूनम कुथे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबाबत “आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.गत 8 वर्षांपासून पूनम चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा ह्या जिल्ह्यात अनेक समाजपयोगी उपक्रम राबवित आहे. त्यांना समाजकार्याची विशेष रुची व आवड आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी असतांना कु.पूनम नानाजी कुथे यांनी अनेक समविचारी युवकांना एकत्रित करून ब्रम्हपुरी नगरीत”न्यु लाईफ बहूउद्देशिय ” ह्या सामाजिक संस्थेची निर्मिती केली. त्या संस्थे मार्फत दरवर्षी वृक्षारोपण, गरजूंना कपडे दान, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीराचे आयोजन या शिवाय अनेक आंदोलनात व मोर्च्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.आत्मरक्षा शिबीर, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरे करणे, अन्यायाच्या विरोधात निवेदने सादर करणे आरोग्यविषयक मदत करणे ,रक्तदान शिबीर आयोजित करणे असे विविध उपक्रम मागील काही वर्षांत त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. ह्या पूर्वी त्यांना अनेक नावाजलेल्या संस्थेमार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ५० पेक्षा अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे.नागपूरात आयोजित पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मनीषा ठाकरे ,माधुरी पालिवाल किताबसिंग चौधरी यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींची उपस्थिती लाभली होती. कु.पूनम कोथे यांना आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.