Home Breaking News Chimur taluka @news • दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नेरीकरांचा खरा...

Chimur taluka @news • दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नेरीकरांचा खरा वाली कोण ॽ •दिग्गज नेते गप्प का बसले!

319

Chimur taluka @news
• दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नेरीकरांचा खरा वाली कोण ॽ
•दिग्गज नेते गप्प का बसले!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

नेरी (चिमूर ) :चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी नेरी या गावाची एक ओळख आहे .नेरी करीता नगरपंचायतची पहिलीअधिसूचना निघाली असली तरी नेरी या गावात विकासाचा कुठलाही लवलेश असल्याचे दृष्टीक्षेपात पडत नाही.दरम्यान शनिवार दि. १६ डिसेंबरला नेरी येथे शंकरजी देवस्थानात एका नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रयोगचाचे नांव होते अन्याय!

या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील स्थानिक मान्यवर मंडळी प्रयोग बघण्यासाठी आली होती. या वेळी अन्यायाबाबत बरेच जण आपसात चर्चा करतांना दिसत होते.पण नेरी गावातील P.H.C. चौक आणि पशुवैद्यकीय दवाखान्याला लागून असलेली नाली ,झालेले अरुंद बांधकाम यावर एकही राजकीय नेता किंवा कार्यकर्ता बोलायला तयार नव्हता. या मागचे नेमके कारण काय हे मात्र कळु शकले नाही.उपरोक्त विषयावर सारे कसे शांत शांत असल्याचे दिसून आले. नेरी चौकाचे विद्रूपीकरण झाले आहे .पण सारे नेतेमंडळी मृग गिळून बसले आहे. सध्या या मोठ्या गावाचा कोणी वाली नाही का असा प्रश्र्न या निमित्ताने साहजिकच निर्माण होतोय .राजकारणातील दिग्गज नेते म्हणून ओळख असणारे नेरीतील अनेक पुढारी व नेते गप्प का बसले हे न उलगडणारे एक कोडेच आहे .आज नेरी मध्ये सोयी सुविधायुक्त बसस्थानक नाही . ऐन बाजार चौकात बसेस थांबतात अश्या परिस्थितीत तिथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आरोग्य केंद्राच्या पुरेश्या सुविधा उपलब्ध नाहीत .कधी कधी रुग्णांना चिमूर ,नागपूरची वाट धरावी लागते .नेरीकरांच्या संरक्षणासाठी पोलिस स्टेशन नाही .नामधारी पोलिस चौकी आहे.परंतू रात्रीच्या पाळीत पोलिस राहत नसल्याची चक्क जनतेची बोंब आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कुठली घटना घडली की वरिष्ठांकडे भ्रमनध्वनीवरुन संपर्क साधावा लागतो .गावातील काही रस्ते आज ही आपली आपबिती सांगत आहेत.अनेक समस्यांचे माहेर घर नेरी बनले आहे.परंतु या कडे कोणत्याही राजकीय दिग्गज नेत्यांचे लक्ष नाही.त्या मुळे नेरीकरांचा खरा वाली आता उरलेला नाही असे दुदैवाने म्हणावे लागते .