Home Breaking News Mul taluka @news •मूल तालूक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन तातडीने थांबवा हो...

Mul taluka @news •मूल तालूक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन तातडीने थांबवा हो ! •दत्तात्रय समर्थ यांचे उपविभागीय अधिका-यांना निवेदन!

80

Mul taluka @news
•मूल तालूक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन तातडीने थांबवा हो !
•दत्तात्रय समर्थ यांचे उपविभागीय अधिका-यांना निवेदन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल (चंद्रपूर):चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील अवैद्य रेती व मुरूम उत्खनन तातडीने थांबविण्याची मागणी मूलचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांच्या कडे आज मंगळवारला सामान्य कामगार सेवाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी सादर केलेल्या एका लेखी निवेदनातुन करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतांशी सर्व रेती घाटावरील उपसा व वाहतूक प्रक्रिया दि. 31 सप्टेंबर 2023 पासून संपली असून तालुक्यातील भांदुर्णा, डोंगरगाव, चिचाळा, हळदी, नलेश्वर, भेजगाव आदिं घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अवैध रेती वाहतूकी मुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून त्या मुळे शासनाने नुकसान आहे.असे सामान्य कामगार सेवाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांचे म्हणणे आहे.
घाटांवर साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक ही विना परवाना व अवैधरित्या सुरू आहे .महसूल अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असून रेती सोबतच विविध ठिकाणावरून मुरूम व मातीचे उत्खनन व वाहतूक धडाक्यात सुरू आहे .वाहतूक परवानगी पेक्षा अधिक पटीने या गौणखणीजांचे उत्खनन होत असून वाहतुकी साठी हायवे वाहनांचा उपयोग सुरू आहे. पोकलँड व जेसीबी मशीन द्वारे उपसा करीत असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. या बाबतीत जातीने चौकशी करून अश्या ठेकेदार व वाहतूकदारांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
उपविभागीय अधिकारी मूल यांना निवेदन सादर करताना दत्तात्रय समर्थ,चंदू चटारे, बंडू गुरूनुले, विनोद आंबटकर, प्रमोद गेडाम, अरविंद दहिवले, संतोष चिताडे,भाऊजी लेनगुरे, नितीन देशमुख, कुणाल शेरकी, जितेंद्र याटकर्लेवार, बंडू घेर, प्रभाकर कावळे, वनराज बेडूकर , सत्यवान गेडाम, देवानंद पेरके, वनराज पेडूकर यांच्यासह संघटनेचे अनेक सदस्यगण उपस्थित होते.