Home Breaking News Chimur taluka@ news •रस्त्यावरील खड्डे चूकवताना बस उतरली शेतात. • जखमींना...

Chimur taluka@ news •रस्त्यावरील खड्डे चूकवताना बस उतरली शेतात. • जखमींना रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल..

221

Chimur taluka@ news
•रस्त्यावरील खड्डे चूकवताना बस उतरली शेतात.
• जखमींना रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल..

✍️ शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर

चिमूर वरून कामपा जाणार हा रस्ता मागील एक वर्षापासून खराब झालेला असून जागोजागी खडे पडलेले आहेत. या रस्त्याचे खड्डे बुजवीन्यासाठी सामाजिक संघटनेसोबत राजकीय पक्ष्यांनी सुधा निवेदन देऊन आंदोलन केले आहे. परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही. या अपघातामुळे कितीतरी अपघात झाले आहेत. आज दिनांक १९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता चिमूर वरून भंडारा करिता जाणारी बस खड्डे चुकवत जात असताना अचानक कवडसी फाट्यावर शेतात घुसली. या बस मध्ये ७० प्रवासी होते. शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र शंक्ररपुर येथे उपचार सुरू आहे. या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन देऊन दखल न घेतल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांचे नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर बांधकाम विभाग अभियंता समीर उपगणलावार आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी डॉ सतीश वारजूकर यांनी २३ डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा अल्टिमेट दिला. बांधकाम विभागाने आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले