Home Breaking News Gadchiroli dist@ news • राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे अन्न व औषध...

Gadchiroli dist@ news • राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते उद्घाटन !

69

Gadchiroli dist@ news
• राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते उद्घाटन !

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

गडचिरोली:शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे ६ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान ६९ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा पुरुष व महिला २०२३-२४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या स्पर्धेचे उद्घाटन ७ जानेवारी २०२४ रोज रविवारला महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभाचे अध्यक्ष शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली, वाय राजाराम महासचिव बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, प्रशांत दोंदल जिल्हा क्रीडा अधिकारी, लीलाधर भराडकर जिल्हा नियोजन समिती सदस्य, डॉक्टर पि.के. पोटाला अध्यक्ष महाराष्ट्र दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन, डी. एस गोसावी कार्याध्यक्ष, अतुल इंगळे महासचिव आणि डॉक्टर सुरज येओतिकर संचालक क्रीडा विभाग, डॉक्टर दर्शना येवतीकर जिजामाता पुरस्कार प्राप्त, राजेंद्र भांडारकर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, युनूस शेख, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया चे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्वप्रथम भारतातून आलेल्या ३० पुरुष २४ महिला संघातील खेळाडू प्रशिक्षण व्यवस्थापक यांच्या अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रात बॉल बॅडमिंटन खेळाला ५ टक्के आरक्षणात समावेश करून संघटनेच्या अडचणी सोडून पुन्हा गत वैभव मिळवून देण्याच्या आश्वासन उपस्थित खेळाडूंना दिले.

याप्रसंगी समस्त राज्याच्या संघाने गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या बँड सोबत सुंदर पथसंचालन करून सर्व क्रीडारसिकांचे लक्ष वेधले तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या खेळाडू आशिष निजाम यांनी मशाल घेऊन मैदानाला वंदन केले. तसेच या स्पर्धेला यशस्वी आयोजनासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी आयोजन समिती अध्यक्ष रशिकांत पापळकर, सचिव अतुल इंगळे, बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडकिलचे अध्यक्ष ओम प्रकाश संग्रामे, प्राध्यापक रूपाली पापडकर, आशिष निजाम, कपिल बागडे, प्रशांत मशाखेत्री, प्रवीण पोयाम, संजय मानकर इत्यादींचे विशेष कौतुक केले. उद्घाटन समारंभाचे संचालन डॉक्टर श्रीराम पवार ठाणे व रमण गागापुरवार प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर पि.के. पटेल तर आभार राजेंद्र भंडारकर यांनी मांडले.