Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर तर्फे...

Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर तर्फे उपवर युवक – युवती परिचय मेळावा संपन्न

257

Chandrapur dist@ news
• चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर तर्फे उपवर युवक – युवती परिचय मेळावा संपन्न

✍️ शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर

चंद्रपूर : – दि. ०७ जानेवारी २०२४ ला सकाळी ११.३० वाजेपासून या उपवर युवक – युवती परिचय मेळाव्याची सुरुवात स्थळः जतिरामजी बर्वे सभागृह चंद्रपूर याठिकाणी झाली.चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ,चंद्रपूर तथा अंतर्गत शाखांच्या संयुक्त विद्यमाने भोई समाजातील उपवर युवक – युवती, विवाह सोहळा तसेच परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असता इच्छुक विधुर विधवा, घटस्फोटिता आणि अपंग यांचा विदर्भस्तरीय मेळावा चंद्रपूर येथे ६ नवदाम्पत्यांचा विवाह सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्याला जिल्ह्यातील विविध ठिकानाहून भोई समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

तर यावेळी जलाशयात बुडणाऱ्यांना वाचवणारे व इतर साहसी कार्य केलेले शूर बांधव, नवनिर्वाचित नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विशेष पुरस्कार मिळविणारे तथा पि.एच डी. प्राप्त व्यक्तींचा या मेळाव्यात सत्कार करण्यात आला. विवाह जुळलेल्या वर – वधूना विवाहाची मोफत व्यवस्था करण्यात आली.
हि व्यवस्था तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृष्णाजी नागपुरे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर तसेच उद्घाटक म्हणून किशोरभाऊ जोरगेवार आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तर प्रमुख अतिथी म्हणून सुधाकरराव अडबाले शिक्षक आमदार, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य प्रमुख यांची उपस्थिती होती.
व चंद्रलालजी मेश्राम निवृत्त न्यायाधीश तथा सदस्य मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र राज्य गजाननराव कामडे संचालक, भू-विज्ञान व खनिकर्म संचालनालय महाराष्ट्र राज्य, नागपूर,प्रकाशराव डायरे सेवानिवृत्त सहसंचालक विदर्भ विकास मंडळ, नालपूर,दीनानाथ वाघमारे संघर्ष पाहिनी प्रमुख, नागपूर, मनोहरराव पचारे सरचिटणीस विदर्भ भोई स.से पुलगांव, सुरेशभाऊ पचारे शिवसेना (ऊ.बा.ठाकरे) गट मनमा प्रमुख चंद्रपूर, बंडुभाऊ हजारे सदस्य जिल्हा नियोजन समिती तथा शिवसेना (शिंदे) गट प्रमुख, चंद्रपूर, यशवंतराव दिघोरे उपाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक व ५०० रूपये देणगीदाऱ्यांना हि स्मरणिका निःशुल्क देण्यात आली.