आयुष्याची वजाबाकी
▪️▪️वैशाली राऊत
नागपूर
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
आयुष्याचे गणित हे
काही सुटता सुटेना
सोडविता प्रश्न काही
उत्तरेच सापडेना.
वजाबाकी आयुष्याची
करतांना गवसले
घेता नेहमी ‘हातचा’
सारे काही मिळवले.
काय कमी काय जास्त
चालायचे येणे जाणे
नको रुसवे फुगवे
आनंदाने स्वीकारणे.
आयुष्याची वजाबाकी
कोडे सर्व सोडवितो
बाकी’ उरता जवळ
स्नेह धागे जुळवितो.
आयुष्याच्या गणितात
वर्ष सरेल अनेक
‘जमे ‘मध्ये घेता सर्व
मिळतील लोक नेक.
अहंकार होता दूर
मिळे मना समाधान
वजा न करता काही
लाभे जिव्हाळ्याचे दान.