.अन् ‘याला’ म्हणे आमदार व्हायचे आहे !
गुंडगिरी करणाऱ्या रावतांच्या कार्यकर्त्यांना महिलांनी धू.. धू.. धुतले..
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा असतात. नगरसेवकाला आमदार व्हावं वाटतं, आमदाराला मंत्री व्हावं वाटतं, तर मंत्र्याला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. महत्त्वाकांक्षा असणं गैर नाही. पण त्यासाठी वाम मार्ग अवलंबणे चुकीचे आहे. गुंडगीरी करणे चुकीचे आहे. अशाच गुंडगिरीचा नमुना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी दिला.
‘विजय झाला तर माजायचे नाही, अन् पराभव झाला तर लाजायचे नाही’, असे विचार ज्या नेत्याचे आहेत, त्या नेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे. सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात त्यांचे मानाचे स्थान आहे. या नेत्याबद्दल त्यांचे विरोधकही आदराने बोलतात. अशात सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. आणि ही दिवाळखोरी संतोष रावत नावाच्या उमेदवाराने काल रात्री दाखवली.
लोकप्रतिनीधी या नात्याने सुधीर मुनगंटीवार मुल तालुक्यातील कोसंबी या गावात लोकांच्या बोलावण्यावर गेले होते. तेथे नलेश्वर तलावाच्या संदर्भात ते ग्रामस्थांशी चर्चा करत होते. तेव्हाच सरपंचाने संतोष रावत यांना बोलावले. संतोष रावत तेथे पोहोचले आणि गावकऱ्यांसोबत हुज्जत घालायला लागले. मुनगंटीवार यांच्याशीही रावतांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पण सभ्य, उच्चविद्याविभूषीत, सुसंस्कृत मुनगंटीवार यांनी त्याही परिस्थितीत रावतांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण रावत भांडणावर उतरले. त्यांचा एक कार्यकर्ता राकेश रत्नावार याने मुनगंटीवार यांच्यावर चालून जाण्याचा प्रयत्न केला.
राकेश रत्नावार मुनगंटीवार यांच्या दिशेने जात असल्याचे बघून महिला भडकल्या. या सर्व सुधीर मुनगंटीवार यांच्या लाडक्या बहीणी. भावावर चाल करून जाणाऱ्याला त्या सोडणार थोडेच होत्या. त्यांनी राकेश रत्नावार, विजय चिमड्यालवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. म्हणजे इतका की, अक्षरशः ‘धू.. धू.. धुतले… चांगलेच तुडवले.’ याचा प्रत्यय काल रात्री कोसंबीवासीयांना आला. पराभव समोर दिसू लागल्यावर रावतांनी काय केले, हे काल कोसंबीवासीयांनी बघितले. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अन् संतोष रावत यांचा सर्व स्तरातून निषेध होऊ लागला.
संतोष रावतसारखा गुंड जर आमदार झाला, तर या मतदारसंघाचे काय होईल, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. असा गुंड आमदार आम्हाला नको, असे बल्लारपूर मतदारसंघातील लोक बोलत आहेत. ‘अन् या गुंडाला म्हणे आमदार व्हायचे आहे’, असेही लोक उपहासाने बोलत आहेत.