• मुनगंटीवारांसाठी भाजपा कार्यकर्त्याची अग्नीपरिक्षा
विधानसभा निवडणूकीचा प्रचाराचा धुराडा आज थंडावणार आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांचेत थेट लढत होण्यांची चिन्हे आहे. अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांची ‘केटली’ही प्रचारादरम्यान चांगलीच गरम झाल्यांने, याचा फटका कुणाला बसेल याची निर्णय 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
सहा महिण्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत सुधीर मुनगंटीवार यांना बल्हारपूर मतदार संघात मोठा फटका बसला होता.
मागील तीन निवडणूकीत सुधीर मुनगंटीवार यांना मिळालेली मते
2009 — 86196 (49.74%)
2014 — 1,03,718 (53.03%)
2019 — 86002 (42.9%)
2014 मध्ये चंद्रपूर जिल्हृयात विशेषत: मूल, पोंभूर्णा तालुक्यात श्रमिक एल्गार या संघटनेचा चांगलाच जोर होता. श्रमिक एल्गारने सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला होता, त्यामुळे मुनगंटीवार यांना त्यावेळी 1 लाख मताचे वरचा टप्पा गाठता आला होता.
2024 च्या लोकसभा निवडणूकीत बल्हारपूर मतदार संघातून 73,452 मते मिळाली होती. सुधीर मुनगंटीवार यांना बल्हारपूर मतदार संघातून या निवडणूकीत सर्वात कमी मते मिळाली होती. राज्यात सर्वाधिक विकास कामे बल्हारपूर मतदार संघात होवूनही मुनगंटीवार यांना मिळालेले मताधिक्य हा चितेंचा आणि चिंतनाचा विषय होता.
2024 च्या लोकसभेत, विरोधकांनी संविधान बदलविणार असल्यांचे तयार केलेले नॅरेटिव्ह, मोदी—शहा—फडणवीस यांचे विरोधाचा बसलेला जबर फटका आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्याबद्दलची जनतेची नाराजी, या कार्यकर्त्यांचा विस्कळीतपणा, परस्परातील हेवेदावे, एकमेकाविरूध्द केलेल्या ‘काड्या’ याशिवाय खुद्द उमेदवार सुधीर मुनगंटीवार याचींच लोकसभेची निवडणूक लढविण्यांसाठी असलेली निराशा, अनिच्छा यामुळेच हे इच्छेविरूध्द या यनिवडणूकीत मुनगंटीवार यांना पाहीजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
या निवडणूकीत मात्र लोकसभेचे वातावरण पूर्ण बदलल्याचे दिसून येत आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ बर्यापैकी मिळाल्यांने आणि या योजनेचे लाभार्थी खुष असल्यांने, सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी ही जमेची बाजू आहे. या निवडणूकीत मोदी—शहा—फडणवीस यांचे विरोधात लोकसभेसारखे आक्रमक विरोधी वातावरण नाही, ही बाब देखिल मुनगंटीवार यांचे पथ्यावर पडणारी आहे. भाजपा सरकारच्या विरोधात कोणतेही नॅरेटिव्ह पसरविण्यात महाविकास आघाडीला यश आले नाही. खुद्द सुधीर मुनगंटीवार हे स्वत:ला पूर्णत: निवडणूकीत विजयासाठी झोकून दिले आहे. कार्यकर्त्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वत:च थेट मतदारांशी कनेक्ट होत आहे. त्यांच्या सभांनाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यांची प्रचार यंत्रणा विशेषत: सोशल मिडीयाची यंत्रणा शिस्तबध्द आणि सातत्य ठेवून काम करीत आहेत. प्रत्येक सभा, इवेंटचेची माहीती तत्काळ मतदारांपर्यंत पोहचत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणूकीचा विचार केला तर, यावेळची विधानसभा सुधीर मुनगंटीवार यांना सोपी झाली आहे. लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने कुणबी समाजाच्या प्रतिभा धानोरकर यांना रिंगणात उतरविले होते. स्वर्गीय बाळू धानोरकर यांची सहानुभूतीच्या अश्रुत मुनगंटीवार यांचा विजय वाहून गेला होता. विधानसभेत मात्र कॉंग्रेसने संतोष रावत यांना उमेदवारी दिल्यांने या निवडणूकीत कॉंग्रेसकडे निवडणूकीत महत्वाची ठरणारी ‘जात’ नाही. कॉंग्रेसकडे सहानुभूतीची लाटही नाही. मात्र मुनगंटीवार यांनी आपला विकास कामे मतदारांपर्यंत पोहचविण्यात यश मिळविल्यांने, विधानसभेत त्यांना ‘फिल गुड’ वातावरण आहे. 2024 च्या विधानसभेत, 2019 ची तिरंगी लढतीची स्थिती आहे. तिरंगी लढतीमुळे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय सोपा आहे.
लोकसभा निवडणूकीत भाजपाचे कार्यकर्ते हवेत होते. सुधीर मुनगंटीवार यांचीच लोकसभेत जाण्याची इच्छा नसल्याचा परिणाम कार्यकर्त्यावर झाला होता. भाऊ पडले तरी, विधानसभेत मंत्री राहणारच. आपला धंदा, दुकानदारी, ठेकेदारी कायम राहणारच हे त्यांना ठाऊक असल्यांने निश्चिंत होते. आता मात्र विधानसभेत भाऊच्या हातातून विजय निसटल्यास, आपल्या धंद्याचे काय, ठेकेदारीचे काय? होईल या कल्पनेनेच त्यांना जीव ओतून सुधीर मुनगंटीवार यांचे विजयासाठी कष्ट करावे लागणार आहे. मागील काही दिवसापासून भाजपाची प्रचार यंत्रणा पाहील्यास, लोकसभेत सुस्त झालेले भाजपा कार्यकर्ते जिद्दीने भिडल्याचे चित्र आहे. पराभव झाल्यास, ‘ना घरका—ना घाटका’ अशी परिस्थिती या कार्यकर्त्याची होणार असल्यांचे त्यांचे प्रचारावरून दिसत आहे.
या निवडणूकीत डॉ. अभिलाषा गावतुरे रिंगणात आहेत. त्यांचे जात कॉम्बीनेशन कुणबी—माळी असले तरी, त्यांच्या प्रचाराचा फोकस ‘माळी’ आहे. माळी समाजावर मागील अनेक वर्षापासून भाजपाचा प्रभाव आहे. डॉ. गावतुरे यांचे माळी फॅक्टर मुळे सुधीर मुनगंटीवार यांची नुकसान होवू शकते. यासाठीच मुनगंटीवार विरोधकांनी त्यांची उमेदवारी ‘प्रायोजीत’ केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आजवर आपण माळी समाजाचे नेते आहोत याच सबबीवर पक्षातील आणि पक्षामुळे मिळणारी पदे उपभागणार्या भाजपातील माळी समाजातील नेत्यांची जबाबदारी आता वाढली आहे. या नेत्यांचा आपल्या समाजावर किती प्रभाव आहे, हे दाखवून देण्याची वेळ त्यांचेवर आली आहे. भाजपात माळी समाजाच्या श्रीमती संध्या गुरूनुले या मोठ्या नेत्या आहेत. त्यांना दोनदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मुनगंटीवार लोकसभेत गेले असते तर, विधानसभेत श्रीमती गुरूनुले दावेदार होत्या. श्रीमती डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा प्रभाव किती कमी करूप मुनगंटीवारना लाभ देवू शकतात, यावरून त्यांचा माळी समाजावरील प्रभाव समजणार आहे.