Gadchiroli dist@ news
• अतिदुर्गम कोप्पेला ते किष्टय्यापल्ली रस्त्याचे होणार बांधकाम
•माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
सिरोंचा: तालुक्यातील अतिदुर्गम,आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या
कोप्पेला ते किष्टय्यापल्ली रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील दुर्गम भागात मुख्य रस्ते नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.या गंभीर बाबीची दखल घेऊन कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणली.नुकतेच या कामाचे निधी मिळताच भाग्यश्री ताई आत्राम यांनी भूमिपूजन केले.लवकरच या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी नगरसेवक रवी रालबंडीवार,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी,विजय रंगुवार,सत्यनारायण चिलकमारी,एम डी शानु, रवी सुल्तान, देवय्या येनगदूला, गणेश बोधनवार,मयूर पुप्पलवार, संदिप गागापुरपू, संतोष पेराला,सरपंच कौशल्या आत्राम, सदस्य सुक्रय्या मडावी,मनोज जनगाम,सरिता कोलमुला, गाव पाटील धर्मय्या निलम, आनंदराव निलम, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.