Gadchiroli dist @news
• ३ कोटी ५० लाखांच्या निधीतून होणार ४ किमीचा रस्ता;दुर्गम भागातील नागरिकांना मिळणार दिलासा
• माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
सिरोंचा:तालुक्यातील अतिदुर्गम किष्टय्यापल्ली ते कोर्लाचेक पर्यंत रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
दुर्गम भागातील रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी ट्रायबल सब प्लॅन अंतर्गत ३ कोटी ५० लाख रुपयांची निधी प्राप्त झाली असून किष्टय्यापल्ली ते कोर्लाचेक पर्यंत चार किलोमीटरचे रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे.पहिल्यांदाच अश्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकासकामे केले जात असल्याने परिसरातील नागरिकांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम व माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले.
भूमिपूजनप्रसंगी भाग्यश्री ताई आत्राम यांनी दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटदारांनी दर्जेदार काम करावे असे आवाहन देखील केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार,विजय रंगूवार,सत्यनारायण चिलकामारी,रायुकॉचे तालुका अध्यक्ष एम डी शानु,देवय्या येनगंदुला,रवी सुल्तान,गणेश बोधनवार,मयूर पुप्पलवार,संदीप गागापुरपू,संतोष पेराला, तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.