Home Breaking News Chimur city@ news • चिमुरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न...

Chimur city@ news • चिमुरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न – रिंगण सोहळा ठरले विशेष आकर्षण

43

Chimur city@ news
• चिमुरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न
– रिंगण सोहळा ठरले विशेष आकर्षण

✍️ शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर

श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूरच्या वतीने दि. २० व २१ जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवाची विविध कार्यक्रमांनी सांगता झाली.
चावडी मोहल्ला चिमूर येथे दि. २० जानेवारीला सकाळी ६ वा. परिसर स्वच्छता व मूर्ती पूजन व घटस्थापना करण्यात आली. दुपारी १ वा. महिला मेळावा व महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वा. मोटारसायकल रॅली तर सायंकाळी ७ वा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मूकबधिर विद्यालय शाळेचे विद्यार्थी चिमूर सहभागी व तेली समाजातील मुला-मुलींचे गीत नृत्य सादर केले. दि. २१ जानेवारीला परिसर स्वछता व सकाळी ८:३० वाजता संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघाली. यात अमरावती येथील वारकरी रिंगण सोहळा विशेष आकर्षण ठरले. दुपारी १ वाजता गुण गौरव सोहळा, बक्षीस वितरण व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव पिसे होते तर उद्घाटन विदर्भ तेली समाज मुख्य संघटक प्रा. रमेश पिसे, यांचे हस्ते संपन्न झाले. पोलिस निरीक्षक मनोज गभणे, सत्यशोधक संघटनेच्या राज्य अध्यक्षा वंदना वनकर, संजय सोनटक्के. धनराज मुंगले. राजू अगडे. उमेश हिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अडव्होकेट धनराज वंजारी. संचालन प्रा.पितांबर पिसे तर आभार प्रदर्शन श्रीहरी सातपुते यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ व सर्व समाज बांधव भगिनींनी अथक परिश्रम घेतले