Home Breaking News Chandrapur dist@ news • अंगणवाडी सेविका- आशा वर्कर यांचा उद्या चंद्रपूरात विराट...

Chandrapur dist@ news • अंगणवाडी सेविका- आशा वर्कर यांचा उद्या चंद्रपूरात विराट मोर्चा व जेलभरो आंदोलन

159

Chandrapur dist@ news
• अंगणवाडी सेविका- आशा वर्कर यांचा उद्या चंद्रपूरात विराट मोर्चा व जेलभरो आंदोलन !

चंद्रपूर :किरण घाटे

अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये वेतन तर मदतनीस यांना २०हजार रुपये वेतन मिळावे तदवतचं ग्रॅज्युटी व पेंशन लागू करावी या शिवाय आशा वर्कर यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस, सात हजार रुपये मानधन वाढ व सरसकट कामाचा मोबदला देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे . शासनाचे या रास्त मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या गुरुवार दि.२५जानेवारीला स्थानिक गांधी चौकातून सकाळी ११वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून तो मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार आहे.त्याच ठिकाणी हे आंदोलन कर्ते जेलभरो आंदोलन करतील अशी माहिती या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सि.आय.टी.यू.चे दिग्गज नेते प्रा.रमेशचंद्र दहीवडे यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बोलताना दिली.बुधवारी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.उद्याचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शोभा राहुलकर, शारदा लेनगुरे,संध्या खनके, सुरेखा तितरे, परविन शेख, रेखा महाजन, जिजाताई भांडेकर, कांता दखने, प्रेमिला बेंदले, प्रेमिला जगताप, माधुरी कवासे, माया कांबळे, अल्का नळे, वंदना जीवने, प्रियंका वनकर,विमल गावंडे , राधा सुकुंरवार, उज्वला पाटील सुषमा बेले , वंदना सुर्यवंशी सायली बावणे, अर्चना गिरसावळे, वंदना बळवाईक संगिता डोर्लीकर, सीमा वनकर , वनमाला भगत , गीता गोहणे, छाया कुमरे, भारती फाले आदिं अथक परिश्रम घेत आहेत.